Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

क्रिकेटच्या मैदानात घुसला Corona, हेड कोच कोरोनाच्या विळख्यात

आताची सर्वात मोठी बातमी, क्रिकेटवरही कोरोनाचं सावट, हेड कोच कोरोनाच्या विळख्यात

क्रिकेटच्या मैदानात घुसला Corona, हेड कोच कोरोनाच्या विळख्यात

सिडनी : जगभरात कोरोनाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत आहे. कोरोनाचं संक्रमण होण्याचा धोका डबल आहे. याच कोरोनाचं संकट क्रिकेटवर आहे. आता कोचही कोरोनाच्या विळख्यात आले आहेत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना बुधवारपासून खेळवला जाणार आहे. 

सिडनी येथे होणाऱ्या या सामन्यापूर्वी दोन्ही संघांना कोरोनाचा फटका बसला आहे. या सामन्याआधी इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्वरवुड देखील कोविड -19 पॉझिटिव्ह आले आहेत. 8 जानेवारीपर्यंत सिल्वरवुड हे 8 जानेवारीपर्यंत क्वारंटाइन असणार आहेत.  इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाने याबाबत माहिती दिली आहे. 

इंग्लंडचे कोच सिल्वरवुड यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. एशेज कसोटीपूर्वी पुन्हा ते संघासोबत जोडले जातील असा कयास आहे. याशिवाय इंग्लंडचे बॉलिंग कोच  जॉन लुईस, स्पिन मेंटर जीतन पटेल कंडीशनिंग विशेषज्ञ डेरेन वेनेस देखील आयसोलेशनमध्ये आहेत. 

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ट्रॅविस हेड देखील कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघावर सध्या कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे येत्या काळात काय होतं कसोटी सामना होणार की नाही हे देखील पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

Read More