Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा शिवलिंगम सुरक्षा रक्षकाचा मुलगा

ऑस्ट्रेलिया येथे सुरु असल्येल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण पदके मिळली आहेत. आज तिसरे सुवर्ण पदक हे सतीश शिवलिंगमने मिळवून दिले.  

भारताला सुवर्ण पदक मिळवून देणारा शिवलिंगम सुरक्षा रक्षकाचा मुलगा

चेन्नई : ऑस्ट्रेलिया येथे सुरु असल्येल्या २१ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण पदके मिळली आहेत. आज तिसरे सुवर्ण पदक हे सतीश शिवलिंगमने मिळवून दिले. मात्र, सतीन शिवलिंगम हा एका सुरक्षा रक्षकाचा मुलगा आहे.

सतीशने ७७ किलो वजनीगटात भारताला सुवर्णपदक मिळवून दिले. मात्र, सतीशला वेटलिफ्टिंगचे शिक्षण त्याच्या वडिलांकडून मिळाले आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवले आणि सतीशने वेटलिफ्टिंगमध्ये करिअर घडविण्याचे ठरविले. त्याचे वडील हे सुरक्षा रक्षक आहेत. सतीशचे वडील एका विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी करत आहेत. तर सतीश चेन्नईमध्ये रेल्वेत क्लार्कची नोकरी करतो. 

सतीशचा जन्म तामिळनाडूतील वेल्लोरमध्ये झालाय. सतीशने याआधी दोन राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून स्वतःची वेगळ ओळख निर्माण केली आहे. तसेच त्याने आशियायी स्पर्धेही चांगले प्रदर्शन केले आहे. त्यांने भारताला तिसरे सुवर्ण पदक मिळवून दिल्याने त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

Read More