Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

CWG2018 : भारताचे तिसरे सुवर्ण पदक, वेटलिफ्लिंगमध्ये मिळाले पदक

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदकाची कमाई झाली आहे. तीन सुवर्ण पदकांसह पाच पदकांची कमाई भारताने केलेय.  

CWG2018 : भारताचे तिसरे सुवर्ण पदक, वेटलिफ्लिंगमध्ये मिळाले पदक

नवी दिल्ली : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक सुवर्ण पदकाची कमाई झाली आहे. तीन सुवर्ण पदकांसह पाच पदकांची कमाई भारताने केलेय. वेटलिफ्लिंगमध्ये सतीश शिवलिंगमने सुवर्णपदकाची कमाई केली.

पुरुषांच्या ७७ किलो वजनी गटात ३१७ किलो वजन उचलून शिवलिंगमने भीम पराक्रम केलाय. त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताच्या वेटलिफ्टर्सनी चांगली कामगिरी केलेय. सध्या भारताच्या खात्यात २ सुवर्ण, १ रौप्य आणि १ कांस्यपदक जमा आहे.

ही चारही पदकं भारताला वेटलिफ्टिंगमध्ये  मिळालेली आहेत. गुरुराजा, मीराबाई चानू, संजिता चानू आणि दीपक लाथेर यांनी पदकांची कमाई केली आहे.

Read More