Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आगामी स्पर्धेच्या ठिकाणी वाटणार २ लाख कंडोम, प्रत्येक स्पर्धकाला ३४ कंडोम

गोल्ड कोस्ट राष्ट्रकूल स्पर्धा भरत असलेल्या ठिकाणच्या गावात २ लाख २५ हजार कंडोम, १७ बजार टॉयलेट रोल्स आणि मोफत आइसक्रिमची व्यवस्था करण्यात आली आहे. 

आगामी स्पर्धेच्या ठिकाणी वाटणार २ लाख कंडोम, प्रत्येक स्पर्धकाला ३४ कंडोम

नवी दिल्ली : गोल्ड कोस्ट राष्ट्रकूल स्पर्धा भरत असलेल्या ठिकाणच्या गावात २ लाख २५ हजार कंडोम, १७ बजार टॉयलेट रोल्स आणि मोफत आइसक्रिमची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी होणाऱ्या स्पर्धेच्या उद्घाटन समारोहाआधी इथे हजारो स्पर्धक आणि सहाय्यक कर्मारी ऑस्ट्रेलियाच्या पूर्व समुद्री तटावरील आपल्या ठरलेल्या ठिकाणी पोहोचले आहेत. मोठ्या प्रमाणात मोफत कंडोम वाटण्याची व्यवस्था याठीकाणी करण्यात आली आहे. प्रति व्यक्ती ३४ कंडोम देण्यात येणार आहेत. ११ दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत सरासरी ३ कंडोम प्रतिदिन देण्यात येणार आहेत. गोल्ड कॉस्ट गावात प्रतिभागी वर्च्युअल रिअॅलिटी कंम्प्यूटर गेम खेळून, स्विमिंग किंवा कृत्रिम झऱ्याजवळ पियानो वाजवू तणाव आणि थकवा दूर करता येऊ शकतो. याव्यतिरिक्त मोफत आईसक्रिमची व्यवस्थाही करण्यात आली आहे.

डायनिंग रुम २४ तास खुला 

इथला डायनिंग रुम २४ तास खुला राहणार असून लगभग ३०० जण जेवण तयार करणार आहेत. वेगान, शाकाहारी, हलाल आणि ग्लूटेन मुक्त आणि लेक्टॉज मुक्त जेवण मिळणार आहे. खेळ सुरू असलेल्या ठिकाणी १२५० अपार्टमेंट आहे. २०१९ च्या जानेवारीपासून विक्री किंवा भाड्याने घेतले जात आहेत. 

Read More