Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

टीम इंडियाची कर्णधार अजिंक्य रहाणे, प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी थोपटली पाठ

ऑस्ट्रेलियातील (Australia) ऐतिहासिक कसोटी मालिकेच्या (Test series) विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (captain Ajinkya Rahane) आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी भारतीयांसमोर आपले मन मोकळे केले आहे.  

टीम इंडियाची कर्णधार अजिंक्य रहाणे, प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी थोपटली पाठ

मेलर्बन : ऑस्ट्रेलियातील (Australia) ऐतिहासिक कसोटी मालिकेच्या (Test series) विजयानंतर भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे (captain Ajinkya Rahane) आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी भारतीयांसमोर आपले मन मोकळे केले आहे. कोव्हिड परिस्थिती आणि भारतीय संघातल्या इन्ज्युरीजचा विचार करता या नव्या मुलांनी केलेली कामगिरी कल्पना करण्यापलिकडली आहे, अशा शब्दांत त्यांनी भारतीय संघाची पाठ थोपटलीय. तर आम्ही रिझल्टचा विचार नाही केला आम्ही केवळ खेळत राहिलो. हा सांघिक विजय असल्याची प्रतिक्रिया अजिंक्य रहाणेने दिली आहे.

टीम इंडियाचे अनेक खेळाडू या सामन्या दरम्यान जखमी झाले होते. अशी अनेक संकंट आली ज्यामुळे भारत हा सामना जिंकू शकणार नाही, असे वाटत होते. मात्र भारतीय खेळाडूंनी संघर्ष करत हा सामना जिंकला. एडिलेडमध्ये पहिला सामना हरल्यानंतर टीम इंडियाने चांगलं कमबॅक केले आहे. 

टीम इंडियाच्या या सीरीजमधून अनेक खेळाडूंना या क्षेत्रात डेब्यू केलं. ज्यामध्ये शुभमन गिल, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, टी नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांच्या नावाचा उल्लेख होईल. ऋषभ पंतला एडिलेड टेस्टमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. मात्र सिडनी आणि ब्रिसबेनमध्ये धमाकेदार ओव्हर खेळल्यामुळे ही सीरीज जिंकता आली. 

विराट कोहली जेव्हा पहिल्या टेस्टनंतर भारतात परतला. तेव्हा भारतीय संघाचा विजय दिसू लागला. मात्र अजिंक्य रहाणेने टीमची जबाबदारी अतिशय यशस्वीपणे पेलली. त्याने भारताच्या विजयसाठी प्रत्येक बाजू पडताळून पाहिली. चेतेश्वर पुजारा काही सामन्यात अपयशी ठरला. मात्र सिडनी आणि ब्रिसबेनमध्ये त्याने अतिशय संयम दाखवला. चेतेश्वर अर्धशतक खेळून ऑस्ट्रेलियासमोर धावांची भिंत उभी केली.

भारताने (India) कसोटी क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाला (Australia ) त्यांच्या भूमित पराभूत करत ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. भारताने ही कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली. (IND vs AUS Brisbane Test Day 5) टीम इंडियाने चौथ्या कसोटीत तीन गड्यांनी विजय मिळवला आहे. या कसोटीत सलामीवीर फलंदाज शुबमन गिल (91), अनुभवी चेतेश्वर पुजारा (56) आणि तुफानी ऋषभ पंत (85 नाबाद) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने ही कसोटी जिंकत मालिकाही खिशात टाकली आहे.

Read More