Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

व्हिडिओ: फुटबॉलच्या मैदानावर मोठा अपघात; रक्तबंबाळ झाला रोनाल्डो

ला लीगा येथे रियड माद्रिद आणि देपोटिवाले यांच्यात रोमहर्षक सामना झाला. पण, या सामन्यावेळी मैदानावर एक मोठा अपघातही पहायला मिळाला. 

व्हिडिओ: फुटबॉलच्या मैदानावर मोठा अपघात; रक्तबंबाळ झाला रोनाल्डो

नवी दिल्ली: ला लीगा येथे रियड माद्रिद आणि देपोटिवाले यांच्यात रोमहर्षक सामना झाला. पण, या सामन्यावेळी मैदानावर एक मोठा अपघातही पहायला मिळाला. हा अपघात इतका मोठा होता की, फुटबॉलपटू रोनाल्डो जागेवरच रक्तबंबाळ झाला. देपोटिवालेचा बचावकर्ता फॅबियन स्कारचा पाय रोनाल्डोच्या डोक्याला लागल्यामुळे हा अपघात घडला. 

जखमी झाल्याने रोनाल्डोला मैदानातून बाहेर पडावे लागले. मात्र, अखेर संघाला विजय मिळवून दिल्यानंतरच त्याने विश्रांती घेतली. रोनाल्डोने २ गोल केले. ज्यामुळे माद्रिदने देपोटिवाल्यांना ७-१ अशा फरकाने धूळ चारली. काय घडले हे जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ...

Read More