Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

क्रिकेट: सांगलीच्या पठ्ठ्याने भारताला मिळवून दिला पहिला विजय

भारतीय क्रिकेट संघाचा सध्यास्थितीला जगभरात दबदबा आहे. हा दबदबा काही एका दिवसात किंवा रात्रीत निर्माण झाला नाही. त्यासाठी अनेक व्यक्तिमत्वांनी कष्ट घेतले आहे. विजय सॅम्यूअल हजारे हे सुद्धा अशाच व्यक्तिमत्वापैकी एक. आज त्यांची जयंती. जयंतीनिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा अल्पसा आढावा.

क्रिकेट: सांगलीच्या पठ्ठ्याने भारताला मिळवून दिला पहिला विजय

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा सध्यास्थितीला जगभरात दबदबा आहे. हा दबदबा काही एका दिवसात किंवा रात्रीत निर्माण झाला नाही. त्यासाठी अनेक व्यक्तिमत्वांनी कष्ट घेतले आहे. विजय सॅम्यूअल हजारे हे सुद्धा अशाच व्यक्तिमत्वापैकी एक. आज त्यांची जयंती. जयंतीनिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्वाचा घेतलेला हा अल्पसा आढावा.

भारताला पहिला विजय मिळवून देणारा क्रिकेटपटू

पश्चिम महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असलेल्या सांगली येथे ११ मार्च १९१५ मध्ये विजय हजारे यांचा जन्म झाला. विजय हजारे हे पहिले कर्णधार आहेत. ज्यांनी भारतीय क्रिकेट संघाला आंतरराष्ट्रीय पतळीवर पहिला विजय मिळवून दिला. त्यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात झालेल्या दोन्ही सामन्यांमध्ये शतकी खेळी केली. तर, हजारे यांच्या नेतृत्वाखाली १९५२ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने चन्नई (मद्रास) येथे इंग्लंडविरूद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात पहिला सामना आठ धावांनी जिंकला.

कर्णधार म्हणूनही जबाबदारी सांभाळली

विजय हजारे यांनी भारतीय क्रिकेटला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून दिली. त्यांनी महाराष्ट्रासाठीही क्रिकेट खळले. यासोबतच १९५१ ते १९५३ या काळात झालेल्या १४ सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून कमान सांभाळली. त्यांनी साधारण ३० टेस्ट सामन्यात भारतासाठी खेळी केली. यात ३ टेस्ट सामन्यांमध्ये भारताला विजय मिळाला.

महायुद्धाच्या काळात क्रिकेटमध्ये पदार्पण

विजय हजारे यांना भारताचा पहिला नामवंत फलंदाज म्हणून ओळखले जाते. ते प्रदीर्घ काळ क्रिकेट खेळू शकले नाहीत. ते क्रिकेटमध्ये नशीब आजमावत होते तेव्हाचा काळ महायुद्धाचा होता. याकाळात ते वयाच्या ३१व्या वर्षी ते टेस्ट क्रिकेटचा पहिला सामना खेळला. हा टेस्ट सामना १९४६मध्ये इग्लंडविरूद्ध लॉर्ड्स येथे खेळला गेला. १९४७-४८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांनी दोन शतके ठोकली. त्यानंतर पुढच्याच वर्षी त्यांनी इग्लंड विरूद्ध झालेल्या सामन्यात सलग ३ शतके ठोकली.

... तर अधिक चांगले खेळाडू बनले असते

हजारे यांनी उत्कृष्ट खेळी केली असली तर, धक्कादायक असे की, ते स्वत:ला चांगले कर्णधार समजत नव्हते. असेही म्हटले जाते की, प्रशासनाने त्यांना जर कर्णधार पदात अडकवले नसते तर, ते अधिक चांगले क्रिकेटपटू बनले असते असेही म्हटले जाते. त्यांचे सहयोगी खेळाडू विजय मर्चंड यांनीही म्हटले होते की, कर्णधार पदामुळे ते क्रिकेटला चांगला न्याय देऊ शकले नाहीत.

Read More