Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Bcci : बीसीसीआय Ajinkya Rahane ला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत

बीसीसीआय (Bcci) सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून 3 खेळाडूंना वगळणार असल्याचं म्हटलं जात आहे.

Bcci : बीसीसीआय Ajinkya Rahane ला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत

मुंबई :  बीसीसीआय (Bcci) दरवर्षी टीम इंडियाच्या खेळाडूंची करार (Bcci Central Contracts) जाहीर करते. या करारात कोणत्या खेळाडूला संबंधित कालवधीसाठी किती वेतन मिळणार याचा उल्लेख असतो. बीसीसीआय एकूण 4 श्रेणीत खेळाडूंची विभागणी करते. या श्रेणीनुसार खेळाडूंचं वार्षिक वेतन ठरतं. बीसीसीआय लवकरच करार जाहीर करणार आहे. यामध्ये टीम इंडियाचं नेतृत्व केलेल्या अंजिक्य रहाणेवर (Ajinkya Rahane) टांगती तलवार आहे. रहाणेला कॉस्टकटिंगचा फटका बसण्याची शक्यता आहे. (bcci soon announce central contract may ajinkya rahane and ishant sharma removed to b grade

मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआय सेन्ट्रल कॉन्ट्रॅक्टमधून 3 खेळाडूंना वगळणार असल्याचं म्हटलं जात आहे. बीसीसीआयची 21 डिसेंबरला बैठक पार पडणार आहे. या बैठकीत अजिंक्य रहाणेसह इंशात शर्माला सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून हटण्याबाबत अंतिम निर्णय होऊ शकतो. तर शुबमन गिल आणि हार्दिक पंड्याला बढती मिळणार असल्याचं समजतंय.  रहाणे आणि इशांत हे बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये बी ग्रुपमध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यानुसार या दोघांना वार्षिक 3 कोटी आहे.  

पीटीआयनुसार, रहाणे इशांतचा पत्ता कट होणार असल्याचं निश्चित आहे. सोबतच विकेटकीपर बॅट्समन ऋद्धीमान साहालाही बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. कारण साहाला सुरुवातीलाच त्याची निवड होणार नसल्याचं सांगण्यात आलं होतं. बीसीसीआय खेळाडूंची एकूण 4 श्रेणीत खेळाडूंची विभागणी करते. ए प्लस, ए, बी आणि सी अशा  4 श्रेणीत खेळाडू विभागले जातात. त्यानुसार खेळाडूंचं वेतन ठरतं. ए प्लस खेळाडूंना 7, ए खेळाडूंना 5, बी श्रेणीतील खेळाडूंना 3 तर सी श्रेणीतील खेळाडूंना 1 कोटी रुपये वार्षिक वेतन करारानुसार दिले जातात.

बीसीसीआय खेळाडूंना कामगिरीसह इतर अन्य निकषांच्या आधारावर कॉन्ट्रॅक्ट देत असतं. ए प्लस आणि ए श्रेणीतील खेळाडू हे तिन्ही फॉर्मेटमध्ये सातत्याने खेळतात किंवा किमान कसोटी संघातील त्यांचं स्थान कायम असावं.  ग्रुप बीमध्ये स्थान मिळवण्यासाठी खेळाडूने किमान 2 फॉर्मेटमध्ये खेळणं बंधनकारक असतं. तर सी श्रेणी ही कोणत्याही एका प्रकारात खेळणाऱ्या खेळाडूंसाठी असते. 

Read More