Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Team India : रोहितची सुट्टी, फॉर्मेटनुसार वेगळी टीम? बीसीसीआयचा नववर्षात नवा 'गेम'

बीसीसीआयचा (Bcci) नवा गेमप्लान नववर्षात टीम इंडियात (Team India) मोठे बदल होण्याची शक्यता.

Team India : रोहितची सुट्टी, फॉर्मेटनुसार वेगळी टीम? बीसीसीआयचा नववर्षात नवा 'गेम'

मुंबई : टीम इंडियाची (Indian Cricket Team) वर्ल्ड कप (World Cup 2022) जिंकण्याची प्रतिक्षा गेल्या 9 वर्षांपासून कायम आहे. टीम इंडियाचा टी 20 वर्ल्ड कपमधील पराभवानंतर बीसीसीआय (Bcci) एक्शन मोडमध्ये आली आहे. येत्या नववर्षात टीम इंडियात नवे बदल पहायला मिळू शकतात. त्यामुळे 2023 हे वर्ष टीम इंडियासाठी निर्णायक ठरू शकतं. बीसीसीआय प्रत्येक फॉर्मेटनुसार स्वतंत्र टीम आणि कॅप्टन अशी रणनिती ठरवत आहे. दैनिक जागरणनुसार,  नववर्षात नवीन निवड समितीची नियुक्ती केली जाऊ शकते. यानंतर प्रत्येक फॉर्मेटसाठी स्वतंत्र संघ निवडण्याची जबाबदारी ही या निवड समितीवर असेल. त्यामुळे लवकरच टीम इंडियात क्रांतिकारी बदल पहायला मिळू शकतो. (bcci may makes new plan form formatwise captain k l rahul rohit sharma)

रिपोर्टनुसार, बीसीसीआय प्रत्येक फॉर्मेटनुसार कॅप्टन करण्याच्या मानसिकतेत आहे. तसेच फॉर्मेटनुसार प्लानही ठरवण्यात येणार आहे. याआधीही असे अनेक रिपोर्ट्स आले होते. त्या रिपोर्टनुसार,  टी 20 टीमचं कर्णधारपद हार्दिक पंड्याला देण्यात येणार असल्याची चर्चा होती. 

हिटमॅनचं काय होणार?

रोहित शर्मा टीम इंडियाचं तिन्ही फॉर्मेटमध्ये सारथ्य करतोय. मात्र फिटनेस आणि सातत्याने सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धांमुळे त्याला विश्रांतीची गरज भासतेय. या दरम्यान रोहित दुखापतग्रस्तही झालाय. त्यामुळे बीसीसीआय रोहितवरचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने भविष्यात निर्णय घेऊ शकते. त्यामुळे बीसीसीआयचा 2023 साठी काय प्लान असणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे. 

दरम्यान बुधवार 14 डिसेंबरपासून टीम इंडिया विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. एकूण 2 सामन्यांची ही मालिका असणार आहे. मालिकेतील पहिला सामना जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. 

कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया : केएल राहुल (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, शार्दुल ठाकुर, मोहम्म सिराज, उमेश यादव, अभिमन्यु ईश्वरन, नवदीप सैनी, सौरभ कुमार आणि जयदेव उनादकट.

Read More