Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

BAN vs NEP : लाईव्ह सामन्यात धक्काबुक्की! बांगलादेशचा खेळाडू रोहितच्या अंगावर आला अन्... पाहा Video

Bangladesh vs Nepal : बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब (Tanzim Hasan Sakib) आणि नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल (Rohit Paudel) यांच्यात जोरदारा वाद झाल्याचं पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

BAN vs NEP : लाईव्ह सामन्यात धक्काबुक्की! बांगलादेशचा खेळाडू रोहितच्या अंगावर आला अन्... पाहा Video

Tanzim Hasan Sakib vs Rohit Paudel : आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा 37 वा सामना नेपाळ आणि बांगलादेश (Bangladesh vs Nepal) यांच्यात खेळवला गेलाय. या सामन्यात बांगलादेशने 21 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने नेपाळसमोर 107 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, नेपाळची टीम 85 धावांवर ऑलआऊट झाली. बांगलादेशने विजयासह सुपर 8 मध्ये एन्ट्री मारलीये. परंतू सामना चर्चेत राहिला तो वादामुळे...  बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब (Tanzim Hasan Sakib) आणि नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल (Rohit Paudel) यांच्यात धक्काबुक्की झाली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. 

झालं असं की, बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब याने तिसरी ओव्हर केली. या ओव्हरच्या पहिल्या पाच बॉलवर त्याने एकही रन दिला नाही. अखेरचा बॉल नेपाळला खेळून काढायचा होता. त्यावेळी नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल मैदानात पाय रोवून उभा होता. तंझीम हसन शाकिबची घातक गोलंदाजी सुरू होती. तोपर्यंत त्याने 2 विकेट देखील घेतल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर रोहित पौडेल याची विकेट मिळावी त्यासाठी तंझीमने उत्तम लेंथ बॉल टाकला. मात्र, कॅप्टन रोहितने त्याला डिफेन्ड केलं अन् विकेट वाचवली.

अखेरच्या बॉलवर विकेट न मिळाल्याने तंझीम भडकला अन् त्याने कॅप्टन रोहितला खुन्नस दिली. रोहितने देखील तंझीमला चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर दोघंही आमने सामने आले अन् बाचाबाची झाली. त्यावेळी तंझीमने रोहितला धक्काबुक्की केल्याचं दिसून आलं. त्यानंतर अंपायर आणि इतर खेळाडूंनी दोघांना बाजूला घेतलं अन् वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तंझीमने रोहितची विकेट घेतली अन् सेलिब्रेशन केलं.  

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

बांगलादेशची टीम : नजमुल हुसैन शांतो (कॅप्टन), तस्कीन अहमद (उपकर्णधार), लिटॉन दास, सौम्या सरकार, तंजिद हसन, शाकिब अल हसन, तॉहिद हृदोय, महमूदुल्लाह, जाकेर अली, तनवीर इस्लाम, मेहदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, शॉरिफुल इस्लाम आणि तंजिम हसन.

नेपाळची टीम : रोहित पौडेल (कर्णधार), आसिफ शेख, अनिल कुमार साह, कुशल भुरटेल, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल आणि कमल सिंग आयरी.

Read More