Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

फेडररनं जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन, २०व्या ग्रँडस्लॅमला गवसणी

स्वित्झर्लंडच्या द्वितीय मानांकित रॉजर फेडररनं मारियन चिलीचवर मात करत ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद पटकावलं.

फेडररनं जिंकलं ऑस्ट्रेलियन ओपन, २०व्या ग्रँडस्लॅमला गवसणी

मेलबर्न : स्वित्झर्लंडच्या द्वितीय मानांकित रॉजर फेडररनं मारियन चिलीचवर मात करत ऑस्ट्रेलियन ओपनचं अजिंक्यपद पटकावलं. फेडररनं अंतिम फेरीच्या मुकाबल्यात क्रोएशियाच्या मारियन चिलिचवर रंगतदार मुकाबल्यात मात केली.

फेडररनं आपली लढत ६-२, ६-७, ६-३, ३-६, ६-१ नं जिंकली. या विजयासह फेडेक्सनं आपल्या टेनिस कारकीर्दीतील २० व्या ग्रँडस्लॅमलाही गवसणी घातली. फेडेक्सच्या धडाक्यासमोर चिलीचचा प्रतिकार अपुरा पडला. पाच सेटमध्ये रंगलेला हा मुकाबला फेडेक्सनं आपल्या शानदार खेळाच्या जोरावर जिंकला. या विजयासह फेडेक्सनं त्याच्या टीकाकारांनाही चोख प्रत्युत्तर दिलं.

Read More