Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

शेन वॉर्नची हत्या झाली का? हॉटेलच्या खोलीतून पोलिसांना सापडला मोठा पुरावा

शेन वॉर्नच्या मृत्यूबाबत नवीन माहिती समोर आली आहे. थायलंड पोलिसांनी याबाबत खुलासा केला आहे

शेन वॉर्नची हत्या झाली का? हॉटेलच्या खोलीतून पोलिसांना सापडला मोठा पुरावा

Shane Warne Death : क्रिकेट जगतातील महान फिरकी गोलंदाज शेन वॉर्नचं (Shane Warne) वयाच्या 52 व्या वर्षी निधन झालं. आता त्याच्या मृत्यूबाबत नवीन माहिती समोर आली आहे. थायलंड पोलिसांनी (thailand police) याबाबत खुलासा केला आहे. शेन वॉर्न थायलंडमध्ये त्याच्या खोलीत बेशुद्धावस्थेत सापडला होता. त्याच्या खोलीतून थायलंड पोलिसांना मोठा पुरावा मिळाला आहे.

पोलिसांना सापडला 'हा' पुरावा
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या खोलीतून रक्ताचे डाग सापडल्याचं थायलंड पोलिसांनी सांगितलं आहे. शेन वॉर्नच्या मृत्यूनंतर स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, त्याच्या मृतदेहाजवळ रक्ताचे डाग आढळले. शेन वॉर्नला बेशुद्ध अवस्थेत सीपीआर देण्यात आला, त्यामुळे रक्त बाहेर आलं असावं, अशीही शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

अजून याबाबत काहीही स्पष्ट सांगता येणार नाही, शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं थायलंड पोलिसांनी सांगितलं आहे. सीपीआर (Cardiopulmonary resuscitation) हा  एक वैद्यकीय उपचार आहे, जो आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी दिला जातो. 

शेन वॉर्नच्या बॉलिंगचा करिश्मा
शेन वॉर्नच्या बॉलिंगच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने 1999 मध्ये ICC क्रिकेट विश्व चषकाचं जेतेपद पटकावलं होतं. या सामन्यात शेन वॉर्नने अवघ्या 33 धावात पाकिस्तानच्या चार फलंदाजांना पॅव्हेलिअनचा रस्ता दाखवला होता, ज्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ अवघ्या 132 धावांवर ढेपाळला होता. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 2 विकेटच्या मोबदल्यात पूर्ण केलं. शेन वॉर्नला सामनावीर म्हणूनही गौरवण्यात आलं होतं.

शतक न करता सर्वाधिक धावा
शेन वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 3154 धावा केल्या, एकही शतक न करता कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. वॉर्नने कसोटी क्रिकेटमध्ये 12 अर्धशतके केली, त्याची सर्वोच्च धावसंख्या 99 होती.  2001 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पर्थ कसोटीत त्याने वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदवली. एकदिवसाय सामन्यात वॉर्नच्या नावावर 1018 धावा जमा आहेत. 

Read More