Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

भारताच्या मदतीसाठी पुढे आला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, PM cares Fund ला दिली इतकी मदत

भारतीयांच्या मदतीसाठी धावला हा ऑस्ट्रेलियन खेळाडू

भारताच्या मदतीसाठी पुढे आला ऑस्ट्रेलियन क्रिकेटर, PM cares Fund ला दिली इतकी मदत

मुंबई : भारतातील वाढत्या कोरोना संक्रमणादरम्यान ऑस्ट्रेलियाचा स्टार बॉलर पॅट कमिन्सने (Pat Cummins) मदतीचा हात पुढे केला आहे. कमिन्स याने गरजूंना मदत करण्यासाठी पीएम केअर फंडला (PM cares Fund) 50,000 डॉलर देण्याची घोषणा केली आहे. ज्यामुळे या खेळाडूचं सर्वच स्तरावर कौतूक होत आहे.

भारतात आयपीएल 2021 (IPL 2021) सुरु आहेत. पण या दरम्यान देशात दररोज तीन लाखाहून अधिक रुग्णांची वाढ होत आहे. ऑक्सिजनअभावी भारतात अनेकांचा मृत्यू झाला आहे. रुग्ण संख्या वाढल्याने ऑक्सीजन प्रचंड मागणी वाढली आहे.

आयपीएलमध्ये पॅट कमिन्स कोलकाता नाईट रायडर्सकडून (KKR) खेळत आहे. त्याने काही तासांपूर्वी ट्विटरवर एक संदेश जारी केला की, 'भारत एक असा देश आहे ज्यासाठी गेल्या काही वर्षांत माझे प्रेम सतत वाढले आहे. इथले लोक चांगले आहेत. सध्या मोठ्या संख्येने कोरोना विषाणूमुळे लोकांना अस्वस्थ होतांना पाहून मी निराश झालो आहे.'

'अशा परिस्थितीतही आयपीएलचे आयोजन भारतात करावे की नाही याची चर्चा काही काळापासून सुरू आहे. मला सांगण्यात आले की आयपीएल खेळ अशा कठीण वेळी काही तास लोकांना आनंद देऊ शकतो.'

पॅट कमिन्स पुढे म्हणाला की, "एक खेळाडू म्हणून मला आयपीएलमध्ये खेळून कोट्यावधी चाहत्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. हे लक्षात घेऊन मी पीएम केअर फंडला पन्नास हजार डॉलर्स देण्याचे ठरविले आहे. विशेषतः मी ही रक्कम गरजूंना ऑक्सिजन खरेदी करता येईल यासाठी देत आहे. मला माहित आहे की मी दान केलेली रक्कम मोठी नाही, परंतु मला आशा आहे की याचा नक्कीच काही ना काही फायदा होईल.''

Read More