Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ऑस्ट्रेलियन उगाच जिंकत नाही...! वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कमिंसचा 'तो' फोटो ठरतोय चर्चेचा विषय

Pat Cummins Viral Pic: ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्डकप विजेता कर्णधार पॅट कमिंन्सकडे टी-20 वर्ल्डकपचं नेतृत्व सोपवलं नसून मिचेल मार्शच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. 

ऑस्ट्रेलियन उगाच जिंकत नाही...! वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या कमिंसचा 'तो' फोटो ठरतोय चर्चेचा विषय

Pat Cummins Viral Pic: टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली असून सध्या अमेरिकेत सामने खेळवले जातयात. यामध्ये गुरुवारी सकाळी ओमान विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ओमानचा 39 रन्सने विजय मिळवला. 2023 मध्ये झालेल्या वनडे वर्ल्डकप ऑस्ट्रेलियाने जिंकल्यामुळे सध्या सुरु असलेला टी-20 वर्ल्डकप जिंकण्यासाठी ही टीम दावेदार मानली जातेय. दरम्यान अशातच ऑस्ट्रेलियाच्या टीमला वर्ल्डकप जिंकवून देणाऱ्या कर्णधाराचा एक फोटो व्हायरल होतोय. 

ऑस्ट्रेलियाने वनडे वर्ल्डकप विजेता कर्णधार पॅट कमिंन्सकडे टी-20 वर्ल्डकपचं नेतृत्व सोपवलं नसून मिचेल मार्शच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. मार्शच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाच्या टीमने वर्ल्डकपमध्ये पहिल्या विजयाची नोंदही केली आहे. अशातच पहिल्या सामन्यातील पॅट कमिंसचा एक फोटो व्हायरल होत असून तो ब्रेकमध्ये खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन जाताना दिसतोय. सध्या कमिंसचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरतोय.

ऑस्ट्रेलियन खेळाडू व्यक्तिगत खेळाऐवजी संघिक खेळावर जोर देतात. याचाच प्रत्यय पहायला मिळाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनशिप आणि वनडे वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या पॅट कमिन्सला चक्क वॉटर बॉयचं काम लावलं. जर रोहित शर्माने वर्ल्ड कप जिंकवला असता तर त्याला असं काम दिलं गेलं असतं का? ऑस्ट्रेलियन खेळाडूला नाही तर संघाच्या कामगिरीला महत्त्व देतं हे पुन्हा एकदा पहायला मिळालंय. त्यामुळे ऑस्ट्रेलियन उगाच जिंकत नाही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

सोशल मीडियावर चाहत्यांच्या म्हणण्यानुसार, वर्ल्ड कप आणि आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणारा कर्णधार आपल्या खेळाडूंना ड्रिंक्स घेऊन जातोय. तर काही चाहते म्हणतायत की, हा क्षण खूप खास आहे. कारण असे यशस्वी कर्णधार फार क्वचित प्रसंगी ड्रिंक्स घेऊन येतात. दरम्यान या कृत्याने पॅट कमिन्सने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून फीडबॅक देतायत.

ऑस्ट्रेलियाकडून ओमानचा विजय

गुरुवारी सकाळी झालेल्या सामन्यात ओमानविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट्कस गमावून 154 रन्स केले. ऑस्ट्रेलियासाठी 2 फलंदाजांनी पन्नास रन्सचा टप्पा पार केला. डेव्हिड वॉर्नरने 41 बॉल्समध्ये 56 रन्स केले. तर ऑलराऊंडर मार्कस स्टॉइनिसने 36 चेंडूत नाबाद 67 रन्स कुटले. यावेळी त्याने 2 फोर आणि 6 सिक्स लगावलेत. ऑस्ट्रेलियाच्या 164 रन्सच्या लक्ष्याला प्रत्युत्तर देताना ओमानची टीम 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून गमावून 125 रन्सच करू शकली. अखेरीस ऑस्ट्रेलियाने पहिला विजय मिळवला आहे.

Read More