Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

world cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय

अंतिम फेरीत धडक मारणार याकडे क्रिकेटचाहत्यांचे लक्ष असणार आहे.   

world cup 2019 : ऑस्ट्रेलियाचा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय

एजबेस्टन : वर्ल्ड कप 2019 मधील दुसरी सेमीफायनल मॅच आज खेळली जाणार आहे. हा सामना पारंपरिक प्रतीस्पर्धी ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात एजबेस्टन यांच्यात खेळली जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 

 

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातून विजयी होणारी टीम फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध भिडेल. ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात साखळी फेरीत झालेला सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 64 रनने विजय झाला होता.  

वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यात एकूण 8 मॅच खेळल्या आहेत. यापैकी 6 मॅच ऑस्ट्रेलियाने तर 2 इंग्लंडने जिंकल्या आहेत. 

त्यामुळे आज ऑस्ट्रेलिया-इंग्लंड यांच्यातून कोण अंतिम फेरीत धडक मारणार याकडे क्रिकेटचाहत्यांचे लक्ष असणार आहे.  


टीम इंग्लंड: जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जो रूट, इऑन मॉर्गन (कॅप्टन), जोस बटलर (विकेट), बेन स्टोक्स, ख्रिस वोक्स, लिआम प्लंकेट, आदिल रशीद, जोफ्रा आर्चर आणि  मार्क वुड 

टीम ऑस्ट्रेलिया: डेव्हिड वॉर्नर, एरॉन फिंच ( कॅप्टन ), स्टीव्हन स्मिथ, पीटर हँड्सकोब, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनीस, एलेक्स केरी,  पॅट कमिन्स, मिशेल स्टार्क, जेसन बेरेन्डॉन्फ आणि नॅथन लायन.  

Read More