Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया संघाच्या भारत दौऱ्याबाबत मोठी बातमी, 'या' मैदानावर रंगणार 5 वर्षांनी कसोटी सामना

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) 4 कसोटी सामन्यांची मालिका (Test Series) खेळवली जाणार आहे.

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया संघाच्या भारत दौऱ्याबाबत मोठी बातमी, 'या' मैदानावर रंगणार 5 वर्षांनी कसोटी सामना

Austraila Tour Of India: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ (Australia Cricket Team) नव्या वर्षात फ्रेब्रुवारी-मार्च महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India vs Australia) 4 कसोटी सामन्यांची मालिका (Test Series) खेळवली जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (World Test Championship) दृष्टीने टीम इंडियासाठी (Team India) ही मालिकी महत्त्वाची ठरणार आहे. या मालिकेतील एक कसोटी सामना अशा मैदानावर रंगणार आहे जिथे गेल्या पाच वर्षात एकही कसोटी सामना खेळवण्यात आलेला नाही. तसंच एक डे-नाईट सामनाही (Day-Night Test) खेळवला जाणार आहे. 

या मैदानावर रंगणार सामना
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत दिल्लीला (Delhi) तब्बल 5 वर्षांनी आयोजनाचा मान मिळण्याची शक्यता आहे. इतर तीन कसोटी सामने ज्या मैदानावर खेळवले जाऊ शकतात त्यात अहमदाबाद (Ahmedabad), धर्मशाला (Dharmshala) आणि चेन्नईचा (Chennai) समावेश आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाच्या (BCCI) रोटेशन पद्धतीनुसार (Rotation Method) दिल्लीला कसोटी सामन्याचं आयोजन दिलं जाऊ शकतं. दिल्लीत शेवटचा कसोटी सामना श्रीलंकेविरुद्ध 2017 मध्ये खेळवण्यात आला होता. 

सीरिज 4-0 जिंकण्याची गरज
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहचण्याच्या दृष्टीने भारतासाठी ही कसोटी मालिका महत्त्वाची आहे. यासाठी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा 4-0 ने पराभव करावा लागणार आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharm) नेतृत्वाखालील टीम इंडियासमोर हे मोठं आव्हान असणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान पारंपारिक प्रथेनुसार चार कसोटी सामन्याची मालिका खेळवली जाते. पण 2024 पासून ही मालिका पाच सामन्यांची होणार आहे.

बीसीसाआच्या सूत्रांची माहिती
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना दिल्लीत खेळवला जाऊ शकतो. बीसीसाआयच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय होईल. 2017 मध्ये धर्मशालात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या मैदानावर या मालिकेतील तिसरा कसोटी सामना होऊ शकतो. तर अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर या मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना आयोजित केला जाऊ शकतो. चार कसोटी सामन्यातील कोणता साना डे-नाईट असेल याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

Read More