Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

AUS vs SA: याला म्हणतात 'परफेक्ट सिक्स'... Beth Mooney ने कॅमेरा फोडलाच असता, पण... पाहा Video

Beth Mooney, AUS vs SA: ऑस्ट्रेलियाने सलग सातव्यांदा ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेची (Womens T20 World Cup Final) फायनल गाठली आहे. त्यामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं.

AUS vs SA: याला म्हणतात 'परफेक्ट सिक्स'... Beth Mooney ने कॅमेरा फोडलाच असता, पण... पाहा Video

AUS W vs SA W : महिला टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका  (AUS vs SA) यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियाची स्टार फलंदाज बेथ मूनीने (Beth Mooney) गगनचुंबी षटकार घेचला आणि कॅमेऱ्यामनचा कॅमेरा फोडलाय. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) होताना दिसतोय. त्याचबरोबर तिने या सामन्यात एक विक्रम (Beth Mooney Record) देखील नावावर केला आहे. त्यामुळे तिची सध्या चर्चा होताना दिसतेय. (AUS vs SA frame worthy six from Beth Mooney in Womens T20 World Cup Final camera explodes video goes viral)

केपटाऊनमध्ये खेळल्या जात असलेल्या या विजेतेपदाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने सलग सातव्यांदा ICC महिला T20 विश्वचषक स्पर्धेची (Womens T20 World Cup Final) फायनल गाठली आहे. त्यामुळे या सामन्यात ऑस्ट्रेलियाने आक्रमक खेळाचं प्रदर्शन केलं. ऑस्ट्रेलियाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 156 धावा केल्या. यात बेथ मूनीने (Beth Mooney) सर्वाधिक 74 धावांची नाबाद खेळी केली.

नेमकं काय झालं?

बेथ मूनीने (Beth Mooney) 53 बॉलमध्ये नाबाद 74 धावा केल्या. त्यात तिने 9 फोर आणि एका सिक्स खेचला. त्याच सिक्सचा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसतोय. मूनीने लॉग ऑफच्या दिशेने उचललेला बॉल बॉन्ड्रीपार गेला. तो बॉल थेट कॅमेऱ्यामॅनच्या कॅमेऱ्याला लागला. त्यात कॅमेरामॅन थोडक्यात वाचल्याचं दिसून आलं.

पाहा Video -

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

Beth Mooney ने रचला विक्रम 

दरम्यान, दोन T20 विश्वचषक फायनलमध्ये अर्धशतके झळकावणारी बेथ मुनी (Beth Mooney) जगातील पहिली महिला खेळाडू ठरली आहे. तर असा पराक्रम करणारी ऑस्ट्रेलियाची ती पहिला महिला खेळाडू ठरली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात तिचं कौतूक होताना दिसतंय.

AUS W vs SA W T20 Live : पाहा दोन्ही संघ

ऑस्ट्रेलिया: अॅलिसा हिली (विकेटकीपर), बेथ मूनी, मेग लॅनिंग (कर्णधार), अॅशले गार्डनर, ग्रेस हॅरिस, एलिस पेरी, ताहिला मॅकग्रा, जॉर्जिया वेरेहॅम, जेस जोनासेन, मेगन शुट, डी'आर्सी ब्राउन.

दक्षिण आफ्रिका: एल वोल्वार्ड, ताजमिन ब्रिट्स, मारिझान कॅप, सुने लुस (कर्णधार), क्लो ट्रायनॉन, अनेके बॉश, नादिन डी क्लर्क, सिनालो जाफ्ता, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा.

Read More