Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Asian Games: मराठमोळ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये टीम इंडियाचा डंका; सेमीफायनलमध्ये प्रवेश

Asian Games: भारत विरूद्ध नेपाळ यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये टीम इंडियाने 23 रन्सने विजय मिळवला आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा धुव्वा उडवला आहे. 

Asian Games: मराठमोळ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये टीम इंडियाचा डंका; सेमीफायनलमध्ये प्रवेश

Asian Games: चीनमधील हांगझोऊमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी पाहायला मिळतेय. यामध्ये भारताचे क्रिकेटर्स देखील मागे राहिले नाहीयेत. भारत विरूद्ध नेपाळ यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये टीम इंडियाने 23 रन्सने विजय मिळवला आहे. पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा धुव्वा उडवला आहे. 

एशियन गेम्स 2023 च्या क्वार्टर फायनल सामन्यात टीम इंडियाने नेपाळचा 23 रन्सने पराभव केला. यासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये धडक मारलीये. प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 ओव्हर्समध्ये 4 विकेट्स गमावून 202 रन्स केले होते. यावेळी टीम इंडियाने नेपाळसमोर विजयासाठी 203 रन्सचं लक्ष्य ठेवलं होतं. 

मात्र या लक्ष्याचा पाठलाग करताना नेपाळच्या टीमला केवळ 179 रन्स केले आहेत. नेपाळकडून दिपेंद्र एरीने सर्वाधिक म्हणजेच 32 रन्स केले. त्यानंतर संदीप झोरा आणि कुशल मल्लाने 29 रन्सचं योगदान दिलं. कर्णधार रोहितला या सामन्यात फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. 

यशस्वी जयस्वालची तुफान खेळी

यशस्वी जयस्वालने 48 बॉल्समध्ये 7 फोर आणि 8 सिक्स लगावत शतक पूर्ण केले. शतक झळकावल्यानंतर त्याला आपला डाव पुढे नेता आला नाही. यावेळी 100 रन्सच्या स्कोरवर त्याने विकेट गमावली. शतक पूर्ण केल्यानंतर जैस्वाल T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा आठवा भारतीय फलंदाज ठरलाय. यापूर्वी सुरेश रैना, केएल राहुल, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी शतकं झळकावली आहेत.

टीम इंडियाच्या खेळाडूंची उत्तम कामगिरी 

टीम इंडियासाठी ओपनर यशस्वी जयस्वालने 49 बॉल्समध्ये सर्वाधिक 100 रन्स केले. यावेळी प्रत्युत्तरात नेपाळच्या टीमने 20 ओव्हर्समध्ये 9 गडी गमावून केवळ 179 रन्स केले. यावेळी भारताने 23 रन्सने हा सामना जिंकला. भारताकडून आवेश खान आणि रवी बिश्नोई हे सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले. आवेश खान आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी 3-3 विकेट्स मिळाले. तर अर्शदीप सिंगला 2 आणि आर. साई किशोरला 1 विकेट मिळाली.

Read More