Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Asian Games मध्ये भारताचा आणखी एक 'Goal'; हॉकी संघाने जिकलं सुवर्णपदक; पॅरिस ऑलिम्पकसाठी पात्र

भारतीय पुरुष हॉकी संघाने एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात भारताने जपानचा 5-1 ने पराभव केला. या विजयासह भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र झाला आहे.   

Asian Games मध्ये भारताचा आणखी एक 'Goal'; हॉकी संघाने जिकलं सुवर्णपदक; पॅरिस ऑलिम्पकसाठी पात्र

भारतीय पुरुष हॉकी संघाने हांगझोऊ एशियन गेम्समध्ये जबरदस्त कामगिरी करत सुवर्णपदक जिंकलं आहे. अंतिम सामन्यात भारताने जपानचा 5-1 ने पराभव केला. भारताकडून कर्णधार हरमनप्रीत सिंगने सर्वाधिक दोन गोल केले. तर मनप्रीत सिंग, अभिषेख आणि अमित रोहिदास यांनी प्रत्येकी एक गोल केला. जपानकडून एकच गोल करण्यात आला. या गोल सेरेन तनाकाने केला आहे. या विजयासह भारतीय हॉकी संघ पॅरिस ऑलिम्पिकसाठी पात्र झाला आहे. 

पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्हीही संघ गोल करण्यात अपयशी ठरले होते. अखेर 25 व्या मिनिटाला भारताला गोल करण्यात यश मिळालं. मनप्रीत सिंगने भारताकडून हा पहिला गोल केला. हाफटाइम झाला तेव्हा भारत 1-0 ने पुढे होता. यानंतर तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने दणादण गोल केले. 32 व्या मिनिटाला कर्णधार हरमनप्रीत सिंगने पेनाल्टी कॉर्नरला गोल केला. यानंतर चार मिनिटांनी म्हणजेच 36 व्या मिनिटाला अमित रोहिदासनेही पेनाल्टी कॉर्नरवर गोल केला. 

यानंतर भारताने चौथ्या क्वार्टरमध्येही दोन गोल केले. आधी 48 व्या मिनिटाला अभिषेकने जबरदस्त फिल्ड गोल केला. दरम्यान जपानच्या सेरेन तनाकाने 51 व्या मिनिटाला पेनाल्टी कॉर्नरचं रुपांतर गोलमध्ये करत स्कोअर 4-1 केला. यानंतर हरमनप्रीतने पेनाल्टी कॉर्नरवर जबरदस्त गोल करत 5-1 असा जबरदस्त विजय मिळवून दिला. 

भारताने चौथ्यांदा जिंकलं सुवर्णपदक

भारतीय संघाने एशियन गेम्समध्ये चौथ्यांदा सुवर्णपदक जिंकलं आहे. याआधी भारताने 1699, 1998  आणि 2014 मध्ये सुवर्णपदक जिंकलं आहे. याशिवाय भारतीय हॉकी संघाने 9 रौप्य आणि 3 कांस्यपदक जिंकली आहेत. विशेष म्हणजे या एशियन गेम्समध्ये भारत अपराजित राहिला. 

भारताने सेमी-फायनल सामन्यात दक्षिण कोरियाला 5-3 ने हरवलं. पण यावेळी संघ लयीत दिसत नव्हता. भारताने साखळी फेरीत जपानचा 4-2 ने पराभव केला होता. 2013 पासून दोन्ही संघ 28 वेळा आमनेसामने आले आहेत, त्यापैकी 23 सामने भारताने जिंकले आहेत. तर जपानने तीन सामने जिंकले आणि दोन सामने अनिर्णित राहिले.

पदकवीर भारतीय हॉकी संघ : हरमनप्रीत सिंग (कर्णधार), पीआर श्रीजेश (गोलकीपर), कृष्णा पाठक (गोलकीपर), वरुण कुमार, अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंग, संजय, सुमित, नीलकांत शर्मा, हार्दिक सिंग (उपकर्णधार), मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, समशेर सिंग, अभिषेक, गुरजंत सिंग, मनदीप सिंग, सुखजित सिंग, ललित कुमार उपाध्याय

Read More