Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Insta Stories मधून विराटला डिवचणाऱ्याला डच्चू! आशिया चषक स्पर्धेच्या संघात स्थान नाही

Asia Cup 2023 Team Squad Announce: यंदाच्या वर्षी पार पडलेल्या इंडियन प्रमिअर लिगच्या स्पर्धेदरम्यान या खेळाडूने अनेकदा सोशल मीडियावरुन विराट कोहलीला ट्रोल केलं होतं.

Insta Stories मधून विराटला डिवचणाऱ्याला डच्चू! आशिया चषक स्पर्धेच्या संघात स्थान नाही

Asia Cup 2023 Team Squad Announce: आशिया चषक स्पर्धेसाठी सर्वच संघांनी तयारी सुरु केली आहे. अफगाणिस्ताननेही पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेटच्या मालिकेनंतर आशिया चषकासाठी 17 खेळाडूंच्या संघांची घोषणा केली आहे. अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये मागील अनेक महिन्यांपासून खेळाडूंच्या वागाण्यावरुन गोंधळ सुरु आहे. अनेक खेळाडूंनी उघडपणे यासंदर्भात बोर्डाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. या वादाचा परिणाम आशिया चषकसाठी संघ निवड करतानाही झाल्याचं दिसत आहे. आपल्या वादग्रस्त कृत्यांमुळे चर्चेत असलेल्या खेळाडूंना अफगाणिस्तानच्या संघात स्थान देण्यात आलेलं नाही. यामध्ये अफगाणिस्तानमधील 2 मोठ्या खेळाडूंचाही समावेश आहे.

विराटबरोबर वाद घालणारा संघाबाहेर

संघाबाहेर असलेल्या खेळाडूंच्या यादीत पहिलं नाव आहे. नवीन-उल-हक. हा तोच खेळाडू आहे ज्याच्यामुळे विराट कोहली आणि गौतम गंभीरदरम्यान यंदाच्या म्हणजेच 2023 च्या एका सामन्यानंतर मैदानात वाद झाला होता. विराट कोहली आणि नवीन-उल-हकदरम्यान मैदानात मोठा वाद झाला. इतकेच नाही तर सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करताना विराट कोहलीचा हात नवीन-उल-हकने झटकला. यावरुन विराटने नीवन-उल-हकला तिथेच झापलं. नंतर या वादात गौतम गंभीरने नवीन-उल-हकची बाजू घेत विराटशी वाद घातला.

सोशल मीडियावरुनही विराटला केलं ट्रोल

बरं हा वाद केवळ मैदानापुरता राहिला नाही तर सोशल मीडियावरही त्याचे पडसाद उमटले. नवीन-उल-हक यानंतर संपूर्ण स्पर्धेदरम्यान खोचक पोस्टच्या माध्यमातून विराट कोहली आणि बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध टीप्पण्या करत राहिला. कधी आरसीबी पराभूत झाल्यानंतर आंबे गोड असल्याची इन्स्टाग्राम स्टोरी तर कधी आरबीसी पराभूत झाल्यानंतर हसणारे मिम्स नवीन-उल-हकने शेअर केले होते. याच नवीन-उल-हकला कर्माची फळं मिळाली म्हणता येईल अशाप्रकारे संघातून बाहेर ठेवण्यात आलं आहे. नवीन-उल-हकने अफगाणिस्तानसाठी 7 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 14 विकेट्स आहेत.

fallbacks

हाणामारी, बॅट उगारण्यासाठी कारणीभूत ठरलेलाही संघाबाहेर

अफगाणिस्तान बोर्डाने संघातील 29 वर्षीय वेगवान गोलंदाज फरीद अहमदला आशिया चषकाच्या संघातून बाहेर ठेवलं आहे. फरीद अहमदने मैदानात वाद घातल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. फरीद अहमदने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि सलामीवीर इमाम-उल-हकला मैदानामध्ये शिव्या घातल्या होत्या. इतकच नाही तर पाकिस्तानच्या आसिफ अलीबरोबर मैदानातच धक्काबुक्कीचा प्रकारही फरीदने केला होता. आसिफ अलीने फरीदला मारायला बॅटही उगारली होती. आता फऱीद अहमदऐवजी करीम जनतला संघात स्थान मिळालं आहे. पाकिस्तानने नुकत्याच झालेल्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेमध्ये पाकिस्तानने अफगाणिस्तानला 3-0 ने पराभूत केलं.

आशिया चषकासाठी अफगाणिस्तानचा संघ कसा आहे?

हशमतुल्लाह शाहिदी (कप्तान), इब्राहिम जादरान, रियाज हसन, रहमत शाह, रहमानुल्लाह गुरबाज, नजीबुल्लाह जादरान, राशिद खान, इकराम अली खिल, करीम जनत, गुलबदीन नईब, मोहम्मद नबी, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, शराफुद्दीन अशरफ, नूर अहमद, अब्दुल रहमान, मोहम्मद सलीम सफी.

Read More