Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Rinku Singh : 'फिनिशर म्हणून नाही तर...', टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आशिष नेहराने केली मोठी भविष्यवाणी!

Ashish Nehra on India Cricket : फिनिशर म्हणून रिंकू सिंहच्या नावाची चर्चा आहे. अशातच आता गुजरात टायटन्सचा कोच आणि टीम इंडियाचा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आशिष नेहरा याने मोठं वक्तव्य केलं आहे.

Rinku Singh : 'फिनिशर म्हणून नाही तर...', टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आशिष नेहराने केली मोठी भविष्यवाणी!

Ashish Nehra Prediction on Rinku Singh : व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये युवराज सिंग आणि एमएस धोनीची भूमिका बजावू शकणाऱ्या फिनिशरची टीम इंडिया (Team India) बऱ्याच दिवसांपासून शोध घेत आहे. फिनिशर असा असावा की कधी कधी टॉप ऑर्डर कोसळल्यावर तो डाव सांभाळू शकेल. आयपीएलमध्ये (IPL 2024) चमक दाखवणाऱ्या रिंकू सिंह (Rinku Singh) याची प्रतिभा उंचावली आहे. त्यामुळे आता फिनिशर म्हणून त्याच्या नावाची चर्चा आहे. अशातच आता गुजरात टायटन्सचा कोच आणि टीम इंडियाचा टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट आशिष नेहरा (Ashish Nehra Prediction) याने मोठं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाला Ashish Nehra ?

रिंकूने पहिल्यांदाच फिनिशिंग केली नाही, त्याने हे अनेकदा करून दाखवलं आहे. टीम इंडियामध्ये रिंकूचा रोल काय असेल? यावर अनेकदा चर्चा होतात. फक्त बॅटिंग करतानाच नाही तर मैदानावर तो ज्या अंदाजात उभा राहतो आणि फिल्डिंग करतो. यावरून कळतंय की, तो प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये 100 टक्के देण्याचा प्रयत्न करतोय. रिंकू सिंह टीम इंडियासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे, तो आगामी काळात अनेक सामने जिंकवून देईल. आपण आत्ता फक्त टी-ट्वेंटी फॉरमॅटविषयी बोलतोय. मात्र, येत्या काळात तो वनडे क्रिकेटमध्ये देखील दिसेल, अशी भविष्यवाणी (Ashish Nehra Prediction on Rinku Singh) आशिष नेहरा याने केली आहे.

मी फिनिशर या शब्दाचा चाहता नाहीये, मला तो प्रेरणादायी शब्द वाटत नाही. तुमचा ओपनर खेळाडू देखील फिनिशर असू शकतो. जर त्याने शतक केलं तर तो उत्तमरित्या फिनिश देखील करू शकतो. रिंकू सिंग बाबत बोलायचं झालं तर तो येत्या काळात वनडे सामन्यात खेळेल, तो नंबर 4 किंवा 5 वर खेळू शकेल. टी-ट्वेंटीमध्ये जेव्हा टीम इंडियाचा स्कोर 5-6 ओव्हरमध्ये 40 वर 4 असा असेल, तर तेव्हा रिंकू फलंदाजी येऊन सामना खेचून घेऊ शकतो. मला आशा आहे की, रिंकू सिंग कोणतीही भूमिका साकारण्यास तयार आहे, मला खात्री आहे की तो स्वत:ला फिनिशर म्हणून टॅग करू इच्छित नाही. त्याने स्वत:ला असा खेळाडू बनवायला हवा जो भारतासाठी प्रत्येक मॅच खेळू शकेल, असं आशिष नेहरा याने म्हटलं आहे. 

आणखी वाचा - IPL 2024 : काय सांगता! संजू सॅमसन होणार होता CSK चा कॅप्टन? आर आश्विनने स्पष्टच सांगितलं, म्हणतो...

दरम्यान, रिंकू सिंहने पहिल्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 14 चेंडूत नाबाद 22 धावा करत संघाला विजय मिळवून दिला होता. त्यानंतर दुसऱ्या टी20 मध्ये त्याने 9 चेंडूत नाबाद 31 धावा करत संघाची धावसंख्या 230 च्या पुढे नेली होती. त्यामुळे आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये रिंकू सिंह याला संधी मिळेल का? असा सवाल आता विचारला जात आहे.

Read More