Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

आशिष नेहराने 'तो' सल्ला दिला अन् यश दयालचं आयुष्य बदललं, म्हणतो 'मी ड्रेसिंग रुममध्ये गेलो अन्...'

Ashish Nehra golden advice to yash dayal : रिंकू सिंगने एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स मारल्यावर ड्रेसिंग रुममध्ये नेमकं काय झालं अन् आशिष नेहराने कोणता सल्ला दिला? यावर खुद्द यश दयालने खुलासा केलाय.

आशिष नेहराने 'तो' सल्ला दिला अन् यश दयालचं आयुष्य बदललं, म्हणतो 'मी ड्रेसिंग रुममध्ये गेलो अन्...'

Yash Dayal opened up Rinku Singh Sixes : आरसीबीचा स्टार गोलंदाज यश दयाल (Yash dayal) याने चमकदार कामगिरी करत चेन्नईविरुद्धचा विजय खेचून आणला. यश दयालने महामहिम धोनीची विकेट काढली अन् आरसीबीचं प्लेऑफचं तिकीट निश्चित केलं. यश दयालसाठी हा आयुष्यातील टर्निंग पाईंट ठरला. गेल्या हंगामात केकेआरविरुद्घच्या सामन्यात गुजरातकडून खेळताना रिंकू सिंगने यश दयालच्या एकाच ओव्हरमध्ये पाच सिक्स (5 Sixes in Row) मारले होते. त्यानंतर यश दयालचं करियर संपलं, अशी चर्चा सुरू होती. त्यावेळी गुजरातचा कोच आशिष नेहराने (Ashish Nehra) यशला असा काही सल्ला दिला होता, त्यामुळे त्याचं नशिब पलटलं. स्वत: यश दयालने यावर खुलासा केलाय.

काय म्हणाला यश दयाल?

सामना सुरु होण्यापूर्वी मला ताप होता. पण मी स्वत:ला खेळण्यासाठी पुश केलं. मी स्वत:शी आणि संघ व्यवस्थापनाशी प्रामाणिक असतो, तर मी केकेआरविरुद्ध तो सामना खेळला नसता. जेव्हा सामना संपल्यानंतर मी ड्रेसिंग रूममध्ये परतलो, तेव्हा गुजरातच्या संघ व्यवस्थापन आणि खेळाडूंनी त्या ओव्हरवर एकदाही चर्चाही केली नाही. त्यावेळी नेहराने मला सल्ला दिला. आशिष नेहराने मला आयुष्यातील पुढील गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितलं आणि मला थोडे कठोर परिश्रम करण्यास सांगितलं, असं यश दयाल म्हणतो. 

आरसीबीमध्ये सामील झाल्यानंतर माझं आयुष्य बदललं. माझ्या कारकिर्दीत वाढ झाली ती त्या ओव्हरमुळे... त्या ओव्हरने मला जीवनातील वास्तवांना सामोरं जावं लागलं. या षटकाने मला खूप काही शिकायला मिळालं. त्या षटकाने मला ज्या गोष्टींसाठी मी तयार नाही त्याची तयारी कशी करावी हे शिकवलं. एवढंच नाही तर जीवनात परिस्थितीचा सामना कसा करावा? याची शिकवण देखील त्या ओव्हरने मला दिली, असंही यश दयाल सांगतो.

दरम्यान, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा भाग बनून खूप आनंद होत आहे आणि आरसीबीचा फॅन असण्याचा एक वेगळा आनंद आहे, जो मला आता अनुभवायला मिळत आहे, असंही यश दयालने यावेळी सांगितलं. 

यश दयालचे वडील म्हणतात...

चेन्नईविरुद्ध सामना रोमांचक स्थितीत असताना अखेरची ओव्हर यशला देण्यात आली. तेव्हा माझ्या मनात भीती होती. मी हात जोडले अन् देवाकडे प्राथर्ना केली की, 'आज पुन्हा तेच होऊ नये देवा, माझ्या मुलाला आज मदत कर' पण पहिल्या बॉलनंतर त्याने स्वत:ला ज्याप्रकारने कंट्रोल केलं ते पाहून मी खुश होतो. सामना जिंकल्यानंतर माझा आनंद गगनात मावत नव्हता, असं यशच्या वडिलांन सांगितलं.

Read More