Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

वर्ल्डकपमध्ये पदक पटकावणारी जिमनास्ट अरुणा ठरली पहिली भारतीय महिला....

हैद्राबादच्या अरुणा बी रेड्डीने आज एक इतिहास रचला आहे.

वर्ल्डकपमध्ये पदक पटकावणारी जिमनास्ट अरुणा ठरली पहिली भारतीय महिला....


मेलबर्न : हैद्राबादच्या अरुणा बी रेड्डीने आज एक इतिहास रचला आहे. अरुणा ही जिमनास्टिक वर्ल्डकपमध्ये व्यक्तीगत पदक जिंकणारी पहिली भारतीय जिमनास्ट ठरली आहे. तिने महिलांच्या स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. २२ वर्षांच्या या जिमनास्टने हिसेन्से एरिनामध्ये १३.६४९ अशी कामगिरी करत कांस्यपदकाला गवसणी घातली आहे. स्लोवानियाच्या टिजासा किसेल्फने १३.८०० या गुणसंख्येवर सुवर्णपदक तर ऑस्टेलियाच्या एमिली वाईटहेडने १३.६९९ या गुणसंख्येच्या आधारावर रौप्यपदक पटकावले.

अजून एक भारतीय अंतिम फेरीत

अंतिम फेरीत पोहचलेल्या भारताच्या प्रणती नायकला १३.४१६ गुणसंख्येमुळे सहाव्या स्थानकावरच समाधान मानावे लागले. अरुणाच्या कामगिरीबद्दल भारतीय जिमनास्टिक्स महासंघाच्या एका गटाचे सचिव शांतीकुमार सिंग यांनी सांगितले की, अरुणा आता वर्ल्डकपमध्ये पदक जिंकणारी पहली आणि एकमेव भारतीय बनली आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे.

पदक पटकावून रचला इतिहास

दीपा करमरकर २०१६ मध्ये झालेल्या रियो ऑल्मपिकच्या महिला स्पर्धेत चौथ्या स्थानावर आहे. तिने आशियाई चॅम्पियनशिप आणि २०१४ मध्ये झालेल्या राष्ट्रमंडळ खेळात कांस्यपदक पटकावले. मात्र वर्ल्डकपमध्ये ती कोणतेही पदक जिंकू शकली नाही. 
हे अरुणाचे पहिले आंतरराष्ट्रीय पदक असून ती २०१३ मधील विश्व आर्टिस्टिक जिमनास्टिक्स चॅम्पियनशिप, २०१४ च्या राष्ट्रमंडळ खेळात आणि २०१४ आशिया खेळात आणि २०१७ च्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत सहभागी झाली होती.आतापर्यंत २०१७ मधील आशियाई चॅम्पियनशिपच्या स्पर्धेत तिची सर्वोत्कृष्ठ कामगिरी होती. मात्र ऑल्मपिकमध्ये तिने अंतिम फेरीपर्यंत मजल मारत इतिहास रचला.

Read More