Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ओठांवर पांढरी क्रीम का लावायचा Andrew Symonds? रॉय नाव कसं पडलं

Andrew Symonds च्या जवळपास सगळ्याच फोटोंमध्ये पांढऱ्या रंगाची क्रीम ओठांवर लावलेली दिसते, त्यामागे नेमकं कारण काय? 

ओठांवर पांढरी क्रीम का लावायचा Andrew Symonds? रॉय नाव कसं पडलं

मुंबई : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू अँड्र्यू सायमंड्स याचं शनिवारी कार अपघातात निधन झालं. या घटनेनं क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली. अचानक अँड्र्यू गेल्यानं मोठा धक्का होता. ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डासह अनेक दिग्गजांनी त्याला श्रद्धांजली अर्पण केली. 

अँड्र्यू सायमंड्सचे फोटो पाहिले की त्या फोटोमध्ये दिसत ती ओठांवर पांढरी क्रीम. या क्रीम लावण्यामागे नक्की काय लॉजिक आहे तो ही का लावायचा यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का? 

 या व्हाइटिंग क्रीममध्ये झिंक ऑक्साईड असतं जे सूर्यापासून होणाऱ्या त्रासाला म्हणजे सर्नबर्नपासून बचाव करतं.  क्रिकेटपटू झिंक ऑक्साईड वापरतात कारण त्यांना 6-7 तास तळपणाऱ्या उन्हात खेळावं लागतं.झिंक ऑक्साईड त्वचेची जळजळ होण्यापासून संरक्षण करण्यास देखील मदत करते.


अँड्र्यू सायमंड्सला त्याचे मित्र आणि कुटुंबातील लोक रॉय नावाने हाक मारायचे. त्यामुळे त्याचं लहानपणापासून नाव रॉय पडलं. त्याच्या कोचनेही रॉय हेच निकनेम ठेवलं. त्यामुळे त्याला रॉय नावानेही ओळखलं जायचं

युजवेंद्र चहल आणि सायमंड्स यांचं खास नातं आहे. 2018 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर युजवेंद्र आणि सायमंड्स यांच्या मैत्रीतील वेगळं नातं पाहायला मिळालं. युजवेंद्रसाठी सायमंड्स सायमो अंकल झाले. 

सायमंड्स आणि वाद
2008 मध्ये अँड्र्यू सायमंड्स आणि हरभजन सिंग यांच्यात मंकीगेटवरून वाद झाला होता. अँड्र्यू सायमंड्सला दारूच्या व्यसनामुळे 2009 साली क्रिकेटपासून दूर राहावे लागलं. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही अँड्र्यू सायमंड्सबाबत वाद संपले नाहीत. 2009 मध्ये त्याने मार्नस लॅबुशेनच्या फलंदाजीवर अपमानास्पद विधान केलं. त्यावरून चॅनलला माफी मागावी लागली.

सायमंड्सचे करिअर
अँड्र्यू सायमंड्सला जगात महान क्रिकेटर म्हणून ओळखलं जात होतं. ऑस्ट्रेलियाकडून त्याने 26 कसोटी, 198 वन डे आणि 14 टी 20 सामने खेळले होते. त्याने 198 वन डे सामन्यात 1462 केले. तर कसोटीमध्ये 5088 रन केले. टी 20 सामने 337 धावा केल्या. त्याने 39 आयपीएल सामने खेळले. 2003 आणि 2007 मध्ये वर्ल्ड कप देशाला जिंकून देण्यात त्याचा वाटा होता. 

 

Read More