Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अबब! इतक्या कोटींची संपत्ती मागे ठेवून गेला Andrew Symonds

अँड्र्यू सायमंड्सच्या मागे पत्नी आणि दोन मुले, क्लो आणि बिली आहेत.

अबब! इतक्या कोटींची संपत्ती मागे ठेवून गेला Andrew Symonds

मुंबई : शेन वॉर्ननंतर जगात आपल्या आगळ्या वेगळ्या कौशल्यासाठी प्रसिद्ध असलेला दिग्गज माजी क्रिकेटपटूचं निधन झालं आहे. वॉर्ननंतर आणखी एक दिग्गज खेळाडू गमावल्याची भावना आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज क्रिकेटपटू अँड्र्यू सायमंड्सचा शनिवारी रात्री कार अपघात झाला. सायमंड्सच्या निधनानंतर अनेकजण त्याच्या आठवणींना उजाळा देतायत. दरम्यान अँड्र्यू सायमंड्स त्याच्या मागे पत्नी आणि दोन मुले, क्लो आणि बिली आहेत. शिवाय त्याच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा झाला आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर अँड्र्यू कोटींची संपत्ती मागे ठेवून गेला आहे. जगातील सर्वोत्तम ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू सायमंड्सची संपत्ती पाच दशलक्ष डॉलर्स इतकी आहे. भारतीय रुपयांमध्ये म्हटलं तर सायमंड्स 38 कोटी 74 लाखांपेक्षा जास्त संपत्तीचा मालक आहे.

अँड्र्यू हा आयपीएलचा एक भाग होता. जगातील सर्वात श्रीमंत लीग IPL च्या पहिल्या सत्रात, त्याला डेक्कन चार्जर्सच्या संघाने USD 1.35 दशलक्ष देऊन आपल्या ताफ्यात जोडलं होतं.

fallbacks

डेक्कन चार्जर्सनंतर अँड्र्यू सायमंड्स मुंबई इंडियन्सकडूनही खेळला. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अँड्र्यू सायमंड्सने कॉमेंट्रीटर म्हणून खेळातील त्याची भूमिका कायम ठेवली. आपल्या आवाजाच्या माध्यमातून तो लोकांच्या मनावर राज्य करत राहिला. यासोबतच तो बिग बॅश लीगमधील ब्रिस्बेन हीट टीमचा मार्गदर्शक होता.

शनिवारी अँड्र्यू सायमंड्सचं कार अपघातात निधन झालं. शनिवारी रात्री उशिरा कार अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांच्या टीमला त्याचे प्राण वाचवण्यात यश मिळालं नाही. त्याच्या निधनानं क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Read More