Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ख्रिस गेलसोबत 5 धडाकेबाज खेळाडूंनी IPL 2022 च्या लिलावातून घेतली माघार

चाहत्यांची मोठी निराशा! धडाकेबाज ख्रिस गेलसोबत 5 खेळाडूंची माघार, पाहा कोण आहेत हे खेळाडू 

ख्रिस गेलसोबत 5 धडाकेबाज खेळाडूंनी IPL 2022 च्या लिलावातून घेतली माघार

मुंबई : आयपीएल कधी होणार याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. मात्र यंदा मेगा ऑक्शनआधी चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. याचं कारण म्हणजे काही स्टार आणि धडाकेबाज खेळाडूंनी ऑक्शनमधून माघार घेतल्याची माहिती मिळाली आहे. 

आयपीएलमध्ये खेळणं हे प्रत्येकाचे स्वप्न असते, कारण ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आयपीएल आहे. सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्याला पुढे अनेक संधीही चालून येतात. आता सर्वांच्या नजरा ऑक्शनकडे वळल्या आहेत. जगातील अनेक स्फोटक खेळाडूंनी आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये आपली नावे दिलेली नाहीत. 

हे खेळाडू असे आहेत जे मैदानात उतरल्यानंतर गेमचेंजर ठरतात. आपल्या धावांनी किंवा बॉलिंगने संपूर्ण खेळाची दिशा बदलण्याची ताकद या खेळाडूंकडे असते. हे खेळाडू मेगा ऑक्शनसाठी सहभागी होणार नसल्याने आता काहीशी क्रिकेटप्रेमींची निराशा देखील झाली आहे. 

आयपीएलच्या 15 व्या हंगामासाठी 7-8 फेब्रुवारी किंवा 11 ते 13 फेब्रुवारीच्या दरम्यान मेगा ऑक्शन होण्याची शक्यता आहे. यंदा अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन नवे संघ उतरणार आहेत. एकूण 10 फ्रान्चायझी मेगा ऑक्शनसाठी उतरणार आहेत. 

ख्रिस गेल
सिक्सरचा बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे असा ख्रिस गेल. स्फोटक फलंदाज गेलनं यंदा आयपीएलच्या मेगा ऑक्शनसाठी आपलं नाव नोंदवलं नाही. सर्वाधिक सिक्स ठोकणारा खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. आयपीएलमध्ये ख्रिस गेलने सर्वाधिक धावांचा पल्ला गाठला आहे. १७५ धावा करत त्याने विक्रम रचला होता. गेलने आयपीएलच्या 149 सामन्यांमध्ये 4000 हून अधिक धावा केल्या आहेत.

मिचेल स्टार्क
मिचेल स्टार्कने देखील आपलं नाव मेगा ऑक्शनसाठी दिलं नाही. आपल्या हटके गोलंदाजीच्या कौशल्यासाठी तो जगप्रसिद्ध आहे. त्याला गोलंदाजीसमोर भल्याभल्या फलंदाजांच्या दांड्या उडतात. त्याला रफ्तार का सौदागर असंही म्हणतात. यॉर्कर गोलंदाजीसाठी तो प्रसिद्ध आहे. त्याने आतापर्यंत 27 सामने खेळून 34 विकेट्स घेतल्या आहेत. केवळ 15 धावा देऊन 4 विकेट्स घेणारा तो गोलंदाज आहे. 

जो रूट
सुपरस्टार फलंदाज जो रूट , ऑलराऊंडर बेन स्टोक्स आणि घातक गोलंदाज जोफ्रा आर्चर यंदाच्या 15 व्या हंगामात दिसणार नाही. या तिघांनीही आपलं नाव मेगा ऑक्शनसाठी दिलं नाही. त्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली आहे. 

Read More