Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

विराट कोहलीनं ब्रायन लाराला टाकलं मागे

भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं वेस्ट इंडिजचा दिग्गज माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराला मागे टाकलं आहे.

विराट कोहलीनं ब्रायन लाराला टाकलं मागे

दुबई : भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं वेस्ट इंडिजचा दिग्गज माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराला मागे टाकलं आहे. जोहान्सबर्ग टेस्टमध्ये कोहलीनं ५४ आणि ४१ रन्सची खेळी केली. यामुळे कोहलीच्या क्रमवारीच्या अंकांमध्ये १२नी वाढ झाली. जोहान्सबर्ग टेस्टच्या सुरुवातीला कोहलीच्या खात्यात ९०० अंक होते. या टेस्टनंतर कोहलीकडे ९१२ अंक आहेत. या यादीमध्ये कोहली २६व्या क्रमांकावर आहे. सर्वाधिक अंक असण्याचं रेकॉर्डऑस्ट्रेलियाचे महान बॅट्समन सर डॉन ब्रॅडमन यांच्या नावावर आहे. ब्रॅडमन यांच्या खात्यात ९६१ अंक होते.

ब्रॅडमन यांच्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टीव्ह स्मिथ या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्मिथच्या खात्यामध्ये सध्या ९४७ अंक आहेत. जोहान्सबर्ग टेस्ट आधी कोहली या यादीमध्ये ३१ व्या क्रमांकावर होता. पण या टेस्टनंतर कोहलीनं लारा(९११), केव्हिन पिटरसन(९०९), हाशीम आमला(९००), शिवनारायण चंद्रपॉल(९०१) आणि मायकल क्लार्क(९००) यांना पिछाडीवर टाकलं.

९१२ अंक असलेला विराट कोहली आता सुनिल गावसकर यांच्या जवळ पोहोचला आहे. १९७९ साली इंग्लंडविरुद्ध ओव्हलमध्ये झालेल्या मॅचवेळी गावसकर यांचे ९१६ अंक होते.

भारत आता जूनमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध जूनमध्ये एक टेस्ट खेळणार आहे. तर ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये इंग्लंड दौऱ्यात भारत ५ टेस्ट खेळणार आहे. या टेस्ट सीरिजमध्ये अंक सुधारण्याची संधी विराट कोहलीकडे आहे. 

 

Read More