Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

स्वतःच्या लग्नात अजिंक्य राहणे ने केली होती 'ही' मोठी चूक; खेळाडूने स्वतःच केला खुलासा

Ajinkya Rahane Birthday : अजिंक्य रहाणेचा ( Ajinkya Rahane ) 35 वा वाढदिवस आहे. स्वतःच्याच लग्नाच्या दिवशी रहाणेने एक मोठी चूक केली होती. त्याच्या या चुकीवर त्याची पत्नी राधिका चांगलीच रागवली होती. 

स्वतःच्या लग्नात अजिंक्य राहणे ने केली होती 'ही' मोठी चूक; खेळाडूने स्वतःच केला खुलासा

Ajinkya Rahane Birthday : उद्यापासून म्हणजेच बुधवारपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनल सामन्याला सुरुवात होणार आहे. इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. दरम्यान हा सामना टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणेसाठी ( Ajinkya Rahane ) फार महत्त्वाचा आहे. याचं कारण म्हणजे तब्बल 18 महिन्यांनी अजिंक्य ( Ajinkya Rahane ) टीम इंडियामध्ये कमबॅक करतोय. 

आज अजिंक्य रहाणेचा ( Ajinkya Rahane ) 35 वा वाढदिवस आहे. उद्या सामना असल्याने यंदा त्याला इंग्लंडमध्येच त्याचा वाढदिवस साजरा करावा लागतोय. या सामन्यात सर्वांच्या नजरा रहाणेवर ( Ajinkya Rahane ) असणार आहेत. त्याच्या वाढदिवसानिमित्तर रहाणेचा ( Ajinkya Rahane ) एक भन्नाट आणि गमतीशीर किस्सा आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. लग्नाच्याच दिवशी अजिंक्य रहाणेसोबत ( Ajinkya Rahane ) हा किस्सा घडला आहे. 

अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane ) उत्तम क्रिकेट खेळतो. भले तो क्रिकेटच्या मैदानात कोणती चूक करत नसेल मात्र पर्सनल आयुष्यात आणि ते ही स्वतःच्याच लग्नाच्या दिवशी रहाणेने एक मोठी चूक केली. दरम्यान त्याच्या या चुकीवर त्याची पत्नी राधिका देखील फार संतप्त झाली असल्याचं खुद्द रहाणेने ( Ajinkya Rahane ) सांगितलं आहे. 

युट्युबवरील एका इंटरव्ह्यूमध्ये रहाणेने ( Ajinkya Rahane ) हा किस्सा सांगितलाय. रहाणे म्हणाला की, लग्न जवळ आलं असताना त्याला शॉपिंगसाठी वेळ मिळाला नव्हता. यावेळी लग्नासाठी मुलीकडचे लोकं कपडे देतात असाच त्याचा समाज होता. त्यामुळे लग्नाच्या दिवशी तो जीन्स आणि टी-शर्ट घालून मंडपात पोहोचला. 

जीन्स घालून ज्यावेळी मी मंडपात गेलो तेव्हा मुलीचं कुटुंबीय माझ्याकडे बघतच राहिलं. राधिकाने जेव्हा माझ्याकडे संतप्त नजरेने पाहिलं तेव्हा मला चूक लक्षात आली. लग्नमंडपातील ही चूक माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती, असं अजिंक्य रहाणे सांगतो.

राधिका रहाणेच्या कपड्यांबद्दल बोलताना म्हणते की, अजिंक्य ( Ajinkya Rahane ) पिवळा टी-शर्ट आणि जीन्स घालून लग्नाला आला होता. यामुळे मला प्रचंड संताप आला होता, मात्र त्यावेळी मी स्वतःला आवरलं.'

राधिका आणि अजिंक्य ( Ajinkya Rahane ) 2014 साली लग्न बंधनात अडकले होते. लग्नाच्या 5 वर्षानंतर राधिकाने एका मुलीला जन्म दिला. रहाणेच्या मुलीचं नाव आर्या असून 2021 मध्ये अजिंक्यच्या ( Ajinkya Rahane ) घरी दुसऱ्या बाळाचं आगमन झालं. अजिंक्य दुसऱ्यांदा बाप झाला असून मुलाचं नाव राघव ठेवण्यात आलं.

Read More