Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

दमदार खेळी केल्यानंतरही कार्तिकला संघात स्थान नाही?

निदहास ट्रॉफी स्पर्धेत भारताचा विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या खेळीचे सर्वत्र कौतुक केले जातेय. त्याने शेवटच्या क्षणी बाजी पलटवली आणि विजय खेचून आणला. 

दमदार खेळी केल्यानंतरही कार्तिकला संघात स्थान नाही?

मुंबई : निदहास ट्रॉफी स्पर्धेत भारताचा विकेटकीपर दिनेश कार्तिकच्या खेळीचे सर्वत्र कौतुक केले जातेय. त्याने शेवटच्या क्षणी बाजी पलटवली आणि विजय खेचून आणला. 

त्याच्या तडाखेबंद २९ धावांच्या खेळीने भारताला बांगलादेशविरुद्ध विजय साकारता आला. मात्र इतकं केल्यानंतरही दिनेश अद्याप भारतीय संघात आपले स्थान पक्के करु शकलेला नाहीये.

कार्तिकला निदहास ट्रॉफी स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीच्या अनुपस्थितीत संधी मिळाली होती. २००६मध्ये पदार्पण करणारा दिनेश कार्तिक आतापर्यंत भारताकडून केवळ १९ सामने खेळलाय. द. आफ्रिका दौऱ्यावरही त्याला कोहलीच्या जागी अखेरच्या टी-२०मध्ये खेळण्याची संधी मिळाली होती. 

अखेरच्या सामन्यात ८ चेंडूत २९ धावांची खेळी करणारा दिनेशला अद्याप अंतिम ११मध्ये स्थान पक्के करता आलेले नाहीये. याचे मुख्य कारण माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंग धोनी. कार्तिकने केवळ आपली फलंदाजी नव्हे तर विकेटकीपिंगनेही प्रभावित केलेय. असे असतानाही हार्दिक पांड्या, श्रेयस अय्यर आणि धोनीच्या पुनरागमनानंतर कार्तिकचे संघात स्थान मिळवणे कठीण दिसतेय.

निदहास ट्रॉफी स्पर्धेतील अखेरच्या दोन ओव्हर

मनीष पांडे बाद झाल्यानंतर कार्तिक १९व्या ओव्हरमध्ये खेळण्यासाठी क्रीझवर आला. त्यावेळी टीम इंडियावा १२ चेंडूत ३४ धावा हव्या होत्या.

१८.१ - कार्तिकने रुबेलच्या पहिल्या चेंडूवर षटकार मारला. आता ११ चेंडूत २८ धावांची गरज
१८.२ - रुबेलच्या दुसऱ्या चेंडूवर कार्तिकने चौकार ठोकला. आता संघाला १० चेंडूत २४ धावांची गरज
८.३ - तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने पुन्हा षटकार ठोकला. जिंकण्याच्या आशा वाढू लागल्या. टीम इंडियाला आता ९ चेंडूत १८ धावांची गरज होती.
१८.४ - रुबेलने चौथ्या चेंडूवर कार्तिकला बीट केले. टीम इंडियाला ८ चेंडूत १८ धावांची गरज. 
१८.५ - १९व्या ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर कार्तिकने दोन धावा काढल्या. आता संघाला ७ चेंडूवर १६ धावांची गरज.
१८.६ - रुबेलच्या अखेरच्या चेंडूवर कार्तिकने फाईन लेगच्या दिशेने चौकार ठोकला. आता टीम इंडियाला विजयासाठी हव्यात १२ धावांची आवश्यकता. 

१९वी ओव्हर

१९.१ - बांगलादेशकडून शेवटची ओव्हर टाकण्यासाठी सौम्या सरकार आला. बॅटिंगसाठी विजय शंकरकडे स्ट्राईक होता. सौम्याने पहिला बॉल वाईड टाकसला. भारताला ६ चेंडूत ११ धावांची गरज.
१९.२ - अखेरच्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर कार्तिक स्ट्राईकवर आला. आता भारताला ४ चेंडूत १० धावा हव्यात.
१९.३ - तिसऱ्या चेंडूवर कार्तिकने केवळ एख धाव घेतली. स्ट्राईक पुन्हा विजय शंकरकडे. भारताला जिंकण्यासाठी ३ चेंडूत ९ धावा. 
१९.४ - चौथ्या चेंडूवर विजय शंकरने चौकार लगावला. आता संघाला विजयासाठी २ चेंडूत ५ धावांची गरज. मैदानात शांतता कारण कोणताही संघ यावेळी जिंकू शकत होता.
१९.५ - पाचवा चेंडू शंकर खेळला. त्याने हवेत शॉट भिरकावला आणि मेहंदा हसनच्या हातात कॅच दिला. आता शेवटचा एक चेंडू आणि धावा हव्यात ५.
१९.६ - शेवटचा चेंडू. स्ट्राईकवर दिनेश कार्तिक. जिंकण्यासाठी षटकार हवा. मॅच ड्रॉ करण्यासाठी चौकार. सौम्याच्या शेवटच्या चेंडूवर दिनेश कार्तिकने एक्स्ट्रा कव्हरवरुन षटकार ठोकला. त्याच्या या षटकाराने जावेद मियांदादची आठवण दिली. 

Read More