Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

अभिषेक शर्माचा युवराज सिंगला व्हिडीओ कॉल, 'गुरू'चा एक सल्ला अन् पठ्ठ्यानं उभ्या उभ्या ठोकलं शतक, पाहा Video

Abhishek Sharma Video Call : अभिषेक शर्मा याने झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या (Ind vs Zim T20i) टी-ट्वेंटी सामन्यात शतक झळकावल्यानंतर गुरू युवराज सिंग (Yuvraj Sing) सोबत काय बोलणं झालं? याचा व्हिडीओ समोर आलाय.

अभिषेक शर्माचा युवराज सिंगला व्हिडीओ कॉल, 'गुरू'चा एक सल्ला अन् पठ्ठ्यानं उभ्या उभ्या ठोकलं शतक, पाहा Video

IND vs ZIM T20I : झिम्बाब्वे विरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) याने झंझावती खेळी करत 46 बॉलमध्ये शतक ठोकलं. आयपीएलमध्ये आपल्या फलंदाजीतून गोलंदाजांना घाम फोडणाऱ्या अभिषेक शर्माने आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील जलवे दाखवण्यास सुरूवात केली आहे. दुसऱ्याच सामन्यात अभिषेक शर्माने 8 सिक्स आणि 4 फोरच्या मदतीने शतकीय खेळी साकारली. अशातच आता सामना जिंकल्यानंतर अभिषेक शर्मा गुरू युवराज सिंगला (Yuvraj Singh) विसरला नाही. अभिषेकने युवराज सिंगला व्हिडीओ कॉल केला. 

अभिषेक शर्माच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाला मोठा विजय मिळवता आला. अभिषेकच्या कुटुंबानेही व्हिडीओ कॉलवरून त्याचं अभिनंदन केलं. त्यानंतर अभिषेकने गुरू युवराज सिंगला व्हिडिओ कॉलही केला. युवराजने अभिषेकच्या या खेळीचे कौतुक केलं. अभिषेक तुझा खूप अभिमान आहे. यापुढे आणखी चांगल्या खेळी होतील, ही फक्त सुरुवात आहे, असं युवराजने अभिषेकला म्हटलं. बीसीसीआयने याचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचवेळी अभिषेकने आपल्या भावना देखील व्यक्त केल्या.

काय म्हणाला अभिषेक शर्मा?

पहिल्या सामन्यात मला चांगली कामगिरी करता न आल्याने, मी युवी पाजीला फोन केला. मला काहीच कळत नव्हतं. पण मी फोन केल्यावर युवी पाजी खूश होता. तू चांगली सुरूवात केली आहे, असं युवी पाजी म्हणाले होते. मला वाटतंय की आता दुसऱ्या सामन्यानंतर त्यांना माझ्यावर गर्व वाटत असेल. मी आत्ता जो काही आहे, ते फक्त युवी पाजीमुळे आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतलीये. फक्त क्रिकेटमध्येच नाही तर क्रिकेटच्या बाहेर जाऊन देखील त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय, असं अभिषेक शर्माने म्हटलंय.\

दरम्यान, सर्वात कमी डावात टी-20 शतक झळकावणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला आहे. ही त्याची फक्त दुसरी खेळी होती. तर दीपक हुडाने शतक झळकावण्यासाठी 3 डाव घेतले. केएल राहुलने चौथ्या डावात शतक झळकावले होते. अभिषेक शर्मा आंतरराष्ट्रीय टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारतासाठी तिसरं जलद शतक झळकावणारा खेळाडू बनला आहे. त्याच्या आधी रोहितने 35 बॉलमध्ये अशी कामगिरी करून दाखवली होती. तर, सूर्यकुमारने 45 बॉलमध्ये शतक ठोकलं होतं. केएल राहुलने देखील 46 बॉलमध्ये सेंच्यूरी ठोकली होती.

Read More