Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

चेला असावा तर असा! गुरूसाठी ऋषभ पंतने केलं खास सेलिब्रेशन; म्हणतो 'आप तो हो नहीं पर...'

MS Dhoni 42nd birthday: धोनीपासून दूर राहूनही जखमी ऋषभ पंतने (Rishabh Pant) वाढदिवस साजरा केलाय. पंतने धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

चेला असावा तर असा! गुरूसाठी ऋषभ पंतने केलं खास सेलिब्रेशन; म्हणतो 'आप तो हो नहीं पर...'

Rishabh Pant Celebrates MS Dhoni’s Birthday: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) म्हणजेच सर्वांचा लाडका माही आज 42 वर्षांचा झाला. धोनी हा क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. आयसीसीच्या तिन्ही फॉर्मटमध्ये टीम इंडियाला घवघवीत यश मिळवून देण्यास धोनीचा मोठा हातभार राहिलाय. अटीतटीच्या सामन्यातही मैदानावर डोकं शांत ठेवत सामान जिंकून देणाऱ्याची कला धोनीला चांगलीच अवगत आहे. त्यामुळे पक्त भारतातच नाही तर जगभरात देखील धोनीच्या फॅन्सची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशातच आता गुरू धोनीच्या वाढदिवसाला (MS Dhoni 42nd birthday) चेला ऋषभ पंतने (Rishabh Pant) खास सेलिब्रेशन केलंय.

धोनीपासून (MS Dhoni) दूर राहूनही जखमी ऋषभ पंतने वाढदिवस साजरा केलाय. पंतने धोनीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ऋषभ पंतने माहीच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्यामध्ये धोनी केकसोबत उभा असल्याचं दिसतंय. धोनीच्या वाढदिवसानिमित्त ऋषभने केक तयार करून घेतला होता. फोटो शेअर करत ऋषभने मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. 

आणखी वाचा - धोनीसारखं शार्प डोकं, ऐश्वर्यासारखी देणखी; सारा टेलरच्या समलैंगिक पार्टनरने दिला मुलाला जन्म!

वाढदिवसाच्या शुभेच्छा माही भाई. तू जवळ नाहीस, त्यामुळे मी तुझ्यासाठी केक कापतोय... वाढदिवसाच्या शुभेच्छा, असं म्हणत ऋषभने आपल्या गुरूविषयी प्रेम व्यक्त केलं आहे. त्यावेळी पोस्टमध्ये त्याने धोनीला टॅग देखील केलंय. इन्टाग्रामवर (Rishabh Pant Instagram Post) सध्या ही पोस्ट तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. आत्ताप्रयन्त 9 लाखाहून अधिक चाहत्यांनी त्याची ही पोस्ट लाईक केली आहे.

पाहा पोस्ट

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rishabh Pant (@rishabpant)

दरम्यान, थाला धोनीच्या वाढदिवसानिमित्त (MS Dhoni’s Birthday) चाहत्यांनी हैदराबादमध्ये 52 फूट लांबीचा कटआउट उभा केला गेला आहे.  सोशल मीडियावर देखील माहीचा चाहता मोठा वर्ग आहे.  सोशल मीडियावर चाहत्यांवर्गाने वाढदिवसाच्या शुभेच्छा देत वर्षाव केला आहे. 

Read More