Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

India vs Sri Lanka T2oI | टीम इंडियाचे 9 स्टार खेळाडू टी 20 सीरिजमधून अचानक बाहेर, नक्की कारण काय?

 टीम इंडियासाठी (Team India) ही काहीशी चिंताजनक बाब आहे. 

India vs Sri Lanka T2oI | टीम इंडियाचे 9 स्टार खेळाडू टी 20 सीरिजमधून अचानक बाहेर, नक्की कारण काय?

कोलंबो :  टीम इंडियाचा बी संघ श्रीलंका दौऱ्यावर (India Tour Sri Lanka 2021) आहे. श्रीलंका विरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्याआधी कृणाल पंड्याचा (Krunal Pandya) कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कृणालला 7 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच दुसरा सामनाही स्थगित करण्यात आला. दरम्यान यानंतर आता टीम इंडियाच्या गोटातून मोठी बातमी समोर येत आहे. पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादवसह टीम इंडियाचे स्टार फलंदाज टी 20 मालिकेतून तडकाफडकी बाहेर झाले आहेत.  त्यामुळे टीम इंडियासाठी ही काहीशी चिंताजनक बाब आहे. (9 players of Team India out of T20 series against Sri Lanka due to Krunal Pandya Corona Positive)

बाहेर होण्यामागचं कारण काय?

रिपोर्टनुसार, कृणालच्या संपर्कात एकूण 9 भारतीय खेळाडू आले होते. त्यामुळे त्यांना या मालिकेतून बाहेर पडले आहेत. इनसाईड स्पोर्ट्सच्या रिपोर्टनुसार, "पृथ्वी शॉ, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ईशान किशन, देवदत्त पडीक्कल, आणि कृष्णप्पा गौतम टी 20 मालिकेतून बाहेर झाले आहेत". दरम्यान याबाबत बीसीसीआयकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

कोरोना शिरला कसा?

उभयसंघाचे दोन्ही खेळाडू हे आयसोलेशनमध्ये आहेत. तरीही यानंतर  कृणालला कोरोना झालाच कसा, असा सवाल क्रिकेट चाहत्यांकडून उपस्थित केला जातोय. दोन्ही संघाचे खेळाडू हे  कोलंबोतील ताज समुद्र हॉटेलमध्ये थांबले आहेत. त्या हॉटेलमधील कर्मचारीही बायो बबलमध्ये आहेत.  हा कोरोना हॉटेल स्टाफ किंवा बस ड्रायव्हरच्या माध्यमातून शिरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read More