Marathi News> भविष्य
Advertisement

Astro Tips For Money : शुक्रवारी देवी लक्ष्मीची करा अशी उपासना, आर्थिक अडचणी दूर होण्यास होईल मदत, जाणून घ्या

Friday Upay For Money : देवी लक्ष्मी म्हणजे धन, वैभव आणि समृद्धीची देवता. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला कृपा राहावी यासाठी मनोभावे पूजा केली जाते. देवी लक्ष्मीची नियमित पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनात भौतिक सुखांची प्राप्ती होते

Astro Tips For Money : शुक्रवारी देवी लक्ष्मीची करा अशी उपासना, आर्थिक अडचणी दूर होण्यास होईल मदत, जाणून घ्या

Astro Tips For Money: देवी लक्ष्मी म्हणजे धन, वैभव आणि समृद्धीची देवता. हिंदू धर्मात देवी लक्ष्मीला कृपा राहावी यासाठी मनोभावे पूजा (Shukrawar Upay) केली जाते. देवी लक्ष्मीची नियमित पूजा केल्यास व्यक्तीच्या जीवनात भौतिक सुखांची प्राप्ती होते. देवी लक्ष्मीची कृपा मिळावी यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय सांगितले गेले आहेत. शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा वार असल्याने या दिवशी भाविक मोठ्या भक्तिभावाने देवीची (Friday Upay For Money) पूजा करतात. शास्त्रात देवीच्या उपासनेचे अनेक प्रकार सांगितले गेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे महालक्ष्मी अष्टकम्..हे स्तोत्राचं रोज पठण केल्याने देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. तसेच हे स्तोत्र फलदायी असल्याचं सांगितलं गेलं आहे. हे स्तोत्र देवराज इंद्राने रचल्याने त्याचं विशेष असं महत्त्व आहे. चला जाणून घेऊयात या स्तोत्राचं महत्त्व

देवराज इंद्राने महालक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या स्तोत्राची रचना केली होती. दुर्वासा ऋषीने श्राफ दिला होता की, इंद्राच्या आधिपत्याखालील तीन लोकातील लक्ष्मीचा लोप होईल. तेव्हा भयभीत झालेल्या सर्व देवतांनी देवी लक्ष्मीची प्रार्थना केली. देवतांच्या प्रार्थनेने देवी लक्ष्मी प्रसन्न झाली. तेव्हा देवराज इंद्राने देवी लक्ष्मीसाठी या स्त्रोताची रचना केली. या स्त्रोताच्या दररोज एका पठणाने पापांपासून मुक्ती मिळते. हे स्तोत्र दोन वाचल्यास धन-धान्याची प्राप्ती होते. तसेच तिनदा पठण केल्यास महालक्ष्मीची सदैव कृपा प्राप्त होते.

बातमी वाचा- Vastu Tips: मकर संक्रांतीला घरातील पूर्व दिशेला ठेवा ही छोटीसी वस्तू, आर्थिक चणचण दूर होणार

महालक्ष्मी स्तोत्र (Mahalaxmi Stotra)

नमस्तेऽस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते।
शंखचक्रगदाहस्ते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
नमस्ते गरुडारूढे कोलासुरभयंकरि।
सर्वपापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
सर्वज्ञे सर्ववरदे देवी सर्वदुष्टभयंकरि।
सर्वदु:खहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
सिद्धिबुद्धिप्रदे देवि भुक्तिमुक्तिप्रदायिनि।
मन्त्रपूते सदा देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
आद्यन्तरहिते देवि आद्यशक्तिमहेश्वरि।
योगजे योगसम्भूते महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
स्थूलसूक्ष्ममहारौद्रे महाशक्तिमहोदरे।
महापापहरे देवि महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
पद्मासनस्थिते देवि परब्रह्मस्वरूपिणी।
परमेशि जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
श्वेताम्बरधरे देवि नानालंकारभूषिते।
जगत्स्थिते जगन्मातर्महालक्ष्मी नमोऽस्तु ते।।
महालक्ष्म्यष्टकं स्तोत्रं य: पठेद्भक्तिमान्नर:।
सर्वसिद्धिमवाप्नोति राज्यं प्राप्नोति सर्वदा।।
एककाले पठेन्नित्यं महापापविनाशनम्।
द्विकालं य: पठेन्नित्यं धन्यधान्यसमन्वित:।।
त्रिकालं य: पठेन्नित्यं महाशत्रुविनाशनम्।
महालक्ष्मीर्भवेन्नित्यं प्रसन्ना वरदा शुभा।।

 

Read More