Marathi News> भविष्य
Advertisement

आषाढी एकादशीचा उपवास चुकून मोडला तर काय करावे?

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीच्या दिवशी समस्त वारकरी उपवास ठेवतात. मात्र, चुकून उपवास मोडला तर अशावेळी काय करायचं जाणून घेऊया. 

 आषाढी एकादशीचा उपवास चुकून मोडला तर काय करावे?

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. आषाढी एकादशीला समस्त भाविक पंढरीला विठुरायाच्या दर्शनासाठी जातात. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा क्षण खूपच भावूक करणारा असतो. महिनाभर वारीत विठुरायाचे नाव घेत चाललेला वारकरी एकादशीला विठुरायाचे दर्शन घेतल्यावर सुखावून जातो. आषाढी एकादशीला हिंदू शास्त्रात महत्त्व आहे. आषाढी एकादशीला निर्जळी उपवास केला जातो. मात्र, अचानक उपवास मोडला, तर काय करावं, हा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी जाणून घ्या काय करावं. पण त्या आधी उपवास म्हणजे काय जाणून घ्या.

एकादशीचा उपवास हा बहुदा द्वादशीला सोडतात. द्वादशीला वारकरी संप्रदायात मोठं महत्त्व आहे. याच दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता आहे. एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या परण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात. द्वादशीच्या दिवशी गोड पदार्थ बनवून देवाला नैवेद्य दाखवून उपवास सोडला जातो. 

उपवास म्हणजे काय?

उपवासाचा संबंध हा फक्त खाण्या-पिण्याशी संबंधित नसून तर मनाच्या आरोग्यासाठीदेखील संबंधित आहे. उपवास म्हणजे माणसे व त्यांच्या स्वतःच्यात असलेल्या अस्तित्वाशी व अंतरात्माशी जोडणारा एक विधी आहे. उपवास या शब्दाची फोड करायची झाल्यास उप म्हणजे जवळ व वास म्हणजे राहणारा. म्हणजे आपल्या सर्वांत जवळ राहणाऱ्याशी भेट करवून देणारा तो उपवास. 

उपवास ही एक शरीर, मन व आत्मा यांना एकत्र जोडणारी योजना आहे. पण शरिराला झेपेल इतकाच उपवास करावा, असंही सांगण्यात येतं. उपवास करताना खाण्या-पिण्यावर निर्बंध असावेत. 

आषाढी एकादशीचा उपवास मोडला तर काय करावे?

एकादशीच्या दिवशी उपवास मोडला तर अशावेळी तुम्ही त्रयोदशीच्या दिवशी उपवास करु शकता. एकादशीच्या दिवशी जसा उपवास केला असता तसाच उपवास त्रयोदशीच्या दिवशी करायचा आहे. त्रयोदशीच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे. तर, चतुर्दशीला दुपारी देवांना नैवेद्य दाखवून उपवास सोडायचा आहे. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More