Marathi News> भविष्य
Advertisement

Vastu Tips: घरात हळदीचं रोप लावणं शुभ असतं! जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तूचं महत्त्व आहे. कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी असायला हवी याबाबत वास्तुशास्त्रात सांगितलं आहे.

Vastu Tips: घरात हळदीचं रोप लावणं शुभ असतं! जाणून घ्या वास्तुशास्त्र काय सांगतं?

Vastu Tips For Plants: वास्तुशास्त्रात प्रत्येक वस्तूचं महत्त्व आहे. कोणती वस्तू कोणत्या ठिकाणी असायला हवी याबाबत वास्तुशास्त्रात सांगितलं आहे. वास्तुशास्त्रात दिशा आणि उपदिशांना महत्त्व आहे. वास्तुशास्त्रात घराच्या आत आणि बाहेरील रोपांबाबत माहिती दिली आहे. ज्योतिष शास्त्रानुसार हळदीचे रोप आरोग्य आणि धार्मिक दृष्ट्या अतिशय शुभ मानले जाते. पण हळदीचे रोप घरात कुंडीत लावता येते का? याबाबत वास्तुशास्त्र आणि धार्मिक ग्रंथ काय सांगतात? जाणून घ्या

हळदीचं रोप 

हळद आरोग्यासाठी आणि धार्मिकदृष्ट्या शुभ मानली जाते. तुम्ही घरी हळदीचे रोप लावू शकता. घरात हळदीचे रोप लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह होतो, ज्याचा परिणाम तुमच्या संपूर्ण कुटुंबावर होतो. यामुळे आरोग्य तर सुधारतेच पण आर्थिक समस्यांपासूनही सुटका मिळू शकते, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

रोपाची काळजी घ्या

घरामध्ये हळदीच्या रोपाला नियमित पाणी द्या. या रोपाची विशेष काळजी घ्या. रोपाच्या आजूबाजूला घाण जमा होऊ देऊ नका. हळदीचे रोप देवी लक्ष्मीला प्रिय असते, असं मानलं जातं. 

घरातील लोकांमध्ये प्रेम वाढते

वास्तुशास्त्रानुसार हळदीच्या रोपाचे एक मोठे वैशिष्ट्य म्हणजे ज्या घरात ती लावली जाते त्या घरातील सदस्यांमध्ये परस्पर स्नेह वाढतो आणि नकारात्मक शक्ती घर सोडून पळून जातात. गुरुवारी भगवान विष्णूला हळदीचा तिलक लावावा, ते आपल्या भक्तांना इच्छित वरदान देतात.

घरातील वास्तुदोष दूर होतो

हळदीचं रोप तुमच्या घरातील वास्तुदोषही दूर करते. हळद अग्नेय दिशेला ठेवल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात असे मानले जाते. घरातील लोकांमध्ये परस्पर स्नेह कायम ठेवण्यासाठी वायव्य दिशेला ठेवावे. हळदीचे रोप योग्य दिशेला ठेवल्यास त्याचे उत्तम परिणाम मिळतात आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE24TAAS याची पुष्टी करत नाही.)

Read More