Marathi News> भविष्य
Advertisement

आजचे राशीभविष्य | शनिवार | १६ मार्च २०१९

जाणून घ्या तुमचं आजचं भविष्य 

आजचे राशीभविष्य | शनिवार | १६ मार्च २०१९

मेष- व्यापारात चढ उतार येऊ शकतात. कामानोकरीच्या ठिकाणी पदोन्नतीचा योग आहे. कामाच्या निमित्ताने प्रवासयोग असण्याची शक्यता आहे. घाई- गडबड होऊ शकते. अडकलेली कामं पूर्ण होतील. जुन्या विकारांमुळे अडचणी वाढतील. 

वृषभ- वरिष्ठांचं सहकार्य असेल. ज्या कामांच्या बाबतीत अडचणी आहेत, असं वाटत असेल तर तिच कामं सहजपणे पूर्णत्वास जातील. कोणत्याही कामाच्या बाबतीत धैर्य ठेवा. आज तुम्ही भावनिक असाल. पण, भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. खाण्यापिण्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. 

मिथुन- व्यापाराच्या नव्या संधी मिळतील. नोकरीच्या ठिकाणी यश मिळण्याची संधी आहे. वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. शुभवार्ता कळू शकेल. आज सुरु केलेली कामं पूर्णत्वास जातील. 

कर्क- प्रयत्नांना यश मिळेल. कुटुंब आणि मित्रांकडून सहकार्य मिळेल. इतरांशी असणारं नातं आणखी दृढ होईल. काही कामं पूर्ण होतील. साथीदारासोबत बाहेर जाण्याचे योग आहेत. 

सिंह- सावध राहण्याची गरज आहे. नोकरी आणि व्यापारात अडचणी येण्याची शक्यता आहे. कोणा एका कामामुळे चिडचीड होऊ शकते. इतरांचं सहकार्य मिळालं नाही तर, मन खिन्न होऊ शकतं. तणावाखाली असाल. 

कन्या- अर्थार्जनासाठी मेहनत करण्याची गरज आहे. प्रेमसंबंधांमध्ये जास्त भावनिक होऊ नका. साथीदाराच्या भावना समजा. मानसिकदृष्ट्या अतिशय सक्रिय असाल. नव्या विचारांनी काम करा. 

तुळ- कार्यक्षेत्र आणि व्यापाराच्या निमित्ताने योग बनतील. अर्थार्जनात वाढ होईल. आज काही कामांच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. नोकरी- व्यापाराच्या दृष्टीने दिवस आव्हानात्मक असेल. स्वत:वर जास्त लक्ष द्या. 

वृश्चिक- कोणाकडून कर्ज घेण्याची गरज लागू शकते. अडचणींची कामं पूर्ण कराल. कोणाच्याही विरोधात जाऊ नका. काही कामं इच्छेविरुद्ध करावी लागतील. साथीदाराचं सहकार्य मिळेल. 

धनु- नोकरीच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. कोणत्याही बाबतीत हट्ट करु नका. पती- पत्नीच्या नात्यांमध्ये तणाव येऊ शकतो. आरोग्याची काळजी घ्या. 

मकर- व्यापार आणि नोकरीच्या बाबतीत प्रवासयोग येण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळतील. आत्मविश्वास वाढलेला असेल. वाहन खरेदीचा विचार कराल. आरोग्याच्या बाबतीतही दिवस चांगला आहे. 

कुंभ- कामाच्या ठिकाणी दिवस चांगला असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नवी जबाबदारी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी जास्त मेहनत घ्यावी लागेल. 

मीन- गुंतवणूकीच्या बाबतीत सावध राहा. जुन्या गोष्टींचा जास्त विचार करु नका.

Read More