Marathi News> भविष्य
Advertisement

Surya Gochar 2022: 'या' राशींवर 11 दिवस सूर्य देवाची राहणार कृपा!

सूर्य देवाच्या या परिवर्तनाने काही राशींचं भाग्य बदलणार आहे. 

Surya Gochar 2022: 'या' राशींवर 11 दिवस सूर्य देवाची राहणार कृपा!

मुंबई : ग्रहांच्या राशीतील बदलाला वैदिक ज्योतिषशास्त्रात महत्त्वाचं मानण्यात येतं. दर महिन्याला कोणत्या ना कोणत्या ग्रहाचं परिवर्तन महत्त्वाचं मानलं जातं. ज्याचा सर्व राशींवर परिणाम होताना. दरम्यान सूर्य देव 17 ऑक्टोबरला भ्रमण करणार आहे. कन्या राशीतून तो तूळ राशीत प्रवेश करेल. सूर्य देवाच्या या परिवर्तनाने काही राशींचं भाग्य बदलणार आहे. पाहूया या राशी कोणत्या आहेत.

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींवर सूर्यदेवाची कृपा राहणार आहे. या राशीच्या व्यक्तींना मेहनतीचा पुरेपूर लाभ मिळेल. कौटुंबिक समस्यांपासून सुटका मिळण्याची देखील शक्यता आहे. याशिवाय उत्पन्नाचे स्रोत वाढतील. जुन्या आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत होणार आहे. 

सिंह राशी

या राशीच्या व्यक्तींची प्रलंबित कामं पूर्ण होणार आहेत. त्याचप्रमाणे तुमच्या मनात ज्या काही इच्छा असतील त्या देखील पूर्ण होतील. परिस्थिती अनुकूल राहील. इतकंच नाही तर तुम्ही तुमच्या वेगळ्या शैलीने इतरांची मनंही जिंकाल.

Retail Inflation: सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा झटका; खाद्यपदार्थ महागणार?; समोर आलं महत्त्वाचं कारण

कन्या राशी

कुटुंबासंदर्भात तुम्ही जे काही निर्णय घेणार आहात तो फायदेशीर ठरणार आहे. सूर्यदेवाच्या कृपेने नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. तुमच्या जवळच्या व्यक्तींचा पाठिंबा तुम्हाला आनंद देईल. 

धनू राशी

सूर्यदेवाच्या परिवर्तनाने तुमचं भाग्य उजळणार आहे. या दरम्यान तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये यश मिळेल. याशिवाय तुम्ही नवी गाडी खरेदी करण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुमचं भरपूर कौतुक होईल. नवीन जबाबदारी मिळून तुम्ही ती योग्यरित्या पार पाडू शकता.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची खातरजमा करत नाही.)

Read More