Marathi News> भविष्य
Advertisement

Surya Gochar: वृश्चिक संक्रांतीमुळे एक महिना तुमच्या राशीवर काय परिणाम होणार, जाणून घ्या

Surya Gochar In Vrushchik Rashi: नवग्रहांमध्ये सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. त्यामुळे सूर्याच्या गोचरामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होतो. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या स्थितीला संक्रांत म्हंटलं जातं. आता सूर्यदेवांनी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे.

Surya Gochar: वृश्चिक संक्रांतीमुळे एक महिना तुमच्या राशीवर काय परिणाम होणार, जाणून घ्या

Surya Gochar In Vrushchik Rashi: नवग्रहांमध्ये सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. त्यामुळे सूर्याच्या गोचरामुळे राशीचक्रातील 12 राशींवर परिणाम होतो. सूर्य एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्या स्थितीला संक्रांत म्हंटलं जातं. आता सूर्यदेवांनी तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश केला आहे. सूर्याला मान सन्मान आणि उच्च पदाचा कारक ग्रह मानलं जातं. अशा स्थितीत ज्या जातकांच्या कुंडलीत सूर्य मजबूत स्थितीत असेल त्यांना या गोचराचा फायदा होईल. महिनाभर सूर्यदेव या राशीत राहणार आहे. त्यानंतर 16 डिसेंबरला धनु राशीत प्रवेश करणार आहे. 

  • मेष- सूर्य गोचरामुळे या राशीच्या जातकांना अनपेक्षित चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. समाजात आदर वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. तसेच आर्थिक स्थिती या काळात रुळावर येईल.
  • वृषभ- नोकरी-व्यवसायासाठी काळ चांगला आहे. नवीन नोकरीची ऑफर मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायात नफा वाढेल. लग्नात विलंब होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात दुरावा निर्माण होऊ शकतो.
  • मिथुन- या राशीच्या लोकांना सूर्य गोचराचा खूप फायदा होईल. कामात यश मिळेल. सहलीला जाण्याचा योग जुळून येईल. तुमच्या बाजूने केसचा निकाल लागू शकतो. तुम्ही हाती घेतलेल्या योजना पूर्ण होतील.
  • कर्क- तुम्ही घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. प्रमोशन मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत राहील. धनलाभ होईल. परीक्षा-मुलाखतीत यश मिळेल.

बातमी वाचा- Grah Gochar 2022: तीन ग्रहांच्या गोचरामुळे चतुर्ग्रही योग! या राशींना होणार फायदा

  • सिंह -आयुष्यात चढ-उतारांना सामोरे जावे लागेल. प्रवासात काळजी घ्या. वाहन चालवताना सतर्क राहा. नुकसान होऊ शकते. पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या.
  • कन्या-एखाद्या कामात यश मिळाल्याने आनंद मिळेल. धैर्य, शौर्य, आत्मविश्वास वाढत राहील. आव्हानांना सहज सामोरे जाल. नियोजन करून काम करा.
  • तूळ- या राशीच्या लोकांसाठी हा काळ संमिश्र असेल. आरोग्याची काळजी घ्या. विशेषत: उजव्या डोळ्यात समस्या येण्याची शक्यता असते. अचानक धनलाभ होईल. नवीन नोकरी मिळण्याची शक्यता आहे.
  • वृश्चिक- संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळेल. समाजात आदर वाढेल. अचानक धनलाभ होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून मदत केली जाईल. परंतु आरोग्यावर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

बातमी वाचा- मंदिरात गेल्यावर तुम्ही प्रदक्षिणा घालता! कोणत्या देवासाठी किती परिक्रमा, जाणून घ्या

  • धनु- या काळात आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. डोळ्यांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. प्रवासात अडचण येऊ शकते. मित्र किंवा नातेवाईकाकडून काही अप्रिय बातमी मिळू शकते.
  • मकर- सूर्याच्या गोचरामुळे मोठे यश मिळेल. नवीन काम सुरू करण्यासाठी उत्तम काळ आहे. करार निश्चित करू शकता. नातेवाईक आणि वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल.
  • कुंभ- सूर्याच्या प्रभावाने खूप फायदा होईल. काम चांगले होईल. सरकारी नोकरीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्यांसाठी काळ चांगला आहे. मात्र पालकांच्या आरोग्याची काळजी घ्या.
  • मीन- अनपेक्षित लाभ होतील. तुमचे निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होईल. अध्यात्माची आवड निर्माण होईल. शत्रूंचा पराभव होईल. आनंदी वाटेल.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More