Marathi News> भविष्य
Advertisement

Surya Gochar: सूर्य आणि राहुमुळे षडाष्टक योग! 17 सप्टेंबरपासून या 5 राशींनी जरा सांभाळूनच

ग्रहांच्या या गोचरांना मानवी जीवनावर थेट परिणाम होत असतो. ग्रहांचा राजा सूर्य 17 सप्टेंबर 2022 रोजी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे.

Surya Gochar: सूर्य आणि राहुमुळे षडाष्टक योग! 17 सप्टेंबरपासून या 5 राशींनी जरा सांभाळूनच

Shadashtak Yog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह गोचर करत असतो. ग्रहांच्या या गोचरांना मानवी जीवनावर थेट परिणाम होत असतो. ग्रहांचा राजा सूर्य 17 सप्टेंबर 2022 रोजी सिंह राशीतून कन्या राशीत प्रवेश करणार आहे. मात्र मेष राशीत असलेल्या राहुमुळे षडाष्टक योग तयार होत आहे. हा सर्वात अशुभ योग असल्याचं ज्योतिषशास्त्रानुसार सांगितलं जातं. या अशुभ योगाचा परिणाम 5 राशींवर होणार आहे. त्यामुळे या राशींनी या काळात जरा सांभाळून राहणं गरजेचं आहे. 

वृषभ: सूर्य आणि राहुमुळे बनलेला षडाष्टक योग वृषभ राशीच्या लोकांसाठी त्रासदायक ठरू शकतो. मोठा निर्णय घेताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. याशिवाय वृषभ राशीच्या लोकांना मानसिक तणावाची समस्या देखील होऊ शकते.

मिथुन: षडाष्टक योगामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन मानसिक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय मित्र आणि नातेवाईकांशी संबंध बिघडू शकतात. त्यामुळे मिथुन राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे.

सिंह: षडाष्टक योगामुळे सिंह राशीच्या लोकांच्या निर्णयक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांनी या काळात वाणीवर नियंत्रण ठेवावे. अन्यथा आर्थिक करिअरच्या आघाडीवर नुकसान होऊ शकते. 17 सप्टेंबरनंतर प्रतिकूल परिस्थितीत शांत राहण्याची गरज आहे.

मकर: मकर राशीच्या लोकांच्या व्यावसायिक जीवनावर षडाष्टक योगाचा प्रभाव पडू शकतो. या लोकांचे कार्यालयातील सहकाऱ्यांशी संबंध खराब होऊ शकतात. याशिवाय मकर राशीच्या लोकांना मानसिक तणाव असू शकतो. त्यामुळे कुटुंबातील संपूर्ण परिस्थिती जाणून घेतल्याशिवाय कोणत्याही गोष्टीवर आपले मत मांडू नका.

कुंभ: कुंभ राशीच्या लोकांवर षडाष्टक योग आर्थिक आघाडीवर नुकसानीस कारणीभूत ठरेल आणि वाढता खर्च तणाव आणि चिंतेचे कारण ठरेल. कुंभ राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच, विवाहित लोकांना जोडीदाराच्या कमकुवत आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More