Marathi News> भविष्य
Advertisement

Tulsi Summer Care | उन्हाळ्यापासून तुळशीला वाचवण्यासाठी 'या' विशेष गोष्टींची घ्या काळजी

Tulsi Plant Care Astro Tips: हिंदू धर्मात तुळशीला विशेष महत्त्व आहे. अशा वेळी घरात तुळशीला सुकणे अशुभ मानले जाते. तुळशीच्या रोपाला कडक उन्हात आणि उष्णतेमध्ये सुकण्यापासून वाचवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Tulsi Plant: तुळशीच्या रोपामध्ये लक्ष्मीचा वास असतो, असे मानले जाते की, तुळशीच्या रोपाची नियमित पूजा केल्याने लक्ष्मी देवीची कृपा कायम राहते. पण कधी कधी घरात लावलेली तुळस सुकते. घरामध्ये तुळशीला वाळवणे अशुभ मानले जाते. अशा स्थितीत ज्योतिषशास्त्रात काही गोष्टी सांगितल्या आहेत. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुळशीचे रोप हिरवे राहते आणि माता लक्ष्मीची कृपा कायम राहते. उन्हाळ्यात तुळशीचे रोप सुकण्यापासून कसे वाचवायचे ते जाणून घेऊया.

सूर्यप्रकाशापासून संरक्षण करण्यासाठी: 

तुळशीचे रोप कडक सूर्यप्रकाशात आणि उष्णतेमध्ये सुकते. अशा स्थितीत देवी लक्ष्मी क्रोधित झाल्याचे मानले जाते. उन्हाळ्यात रोप वाचवण्यासाठी रोपावर लाल रंगाची चुनरी टाकावी. जेणेकरून थेट सूर्यप्रकाश तुळशीच्या रोपावर पडू नये. किंवा तुळशीच्या रोपाची जागा बदला. जिथे काही काळ सावली असते. त्या ठिकाणी तुम्ही ठेऊ शकता.

तुळशीला थोडे कच्चे दूध घालावे: 

तुळशीचे रोप उन्हात सुकू नये म्हणून त्यात ओलावा राखणे आवश्यक आहे. अशा वेळी तुळशीच्या रोपामध्ये पाणी टाकताना थोडे कच्चे दूधही टाकावे. असे केल्याने, रोपातील ओलावा बराच काळ टिकून राहील. याशिवाय तुळशीचे रोप लावताना कुंडीच्या तळाशी नारळाचा फायबर टाकून त्यावर माती टाकून रोप लावावे. यामुळे तुळशीच्या रोपामध्ये आर्द्रता टिकून राहते.

देवाला मंजिरी अर्पण करा: 

तुळस भगवान विष्णूला खूप प्रिय आहे, अशी धार्मिक मान्यता आहे. म्हणून तुळशीच्या रोपावर मंजिरी आल्यावर ती त्यावर राहू देऊ नका. श्री हरींच्या चरणी अर्पण करा. यामुळे तुळशीची वाढ लवकर होईल. याशिवाय मंजिरी पुन्हा जमिनीत टाकून बियाणे म्हणूनही वापरता येते.

Read More