Marathi News> भविष्य
Advertisement

Shukra Gochar 2022: 'या' चार राशींवर मोठे संकट कोसळणार, करा हे उपाय…

Venus Zodiac Change December 2022:  या वर्षातील शेवटचे शुक्र संक्रमण 29 डिसेंबर रोजी होणार आहे. त्याच्या संक्रमणामुळे चार राशींवर मोठे संकट कोसळणार आहे. अशा अनेक घटना त्याच्या आयुष्यात घडू शकतात, ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल. पण हे संकट टाळण्यासाठी काही उपाय आहेत. ते केल्यावर तुमच्यावरचे संकट नक्कीच दूर होईल.

Shukra Gochar 2022: 'या' चार राशींवर मोठे संकट कोसळणार, करा हे उपाय…

Shukra Gochar December 2022:  29 डिसेंबर 2022 रोजी शुक्राची राशी परिवर्तन करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र त्या दिवशी दुपारी 3.45 वाजता राशी बदलेल. शुक्राचं राशीपरिवर्तन काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत अशुभ ठरणार आहे. तर काही राशीच्या लोकांवर वाईट वेळ येईल. कोणत्या आहेत त्या दुर्देवी राशी पाहुयात. लोकांना सुख आणि समृद्धी प्रदानसाठी शुक्र ग्रह 29 डिसेंबर रोजी मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनिदेव आधीच विराजमान आहेत. पुढील वर्षी 17 जानेवारी 2023 रोजी तो कुंभ राशीत प्रवेश करेल. असे म्हटले जाते की शुक्र ग्रहाच्या राशीतील बदलामुळे लोकांसाठी अनेक शुभ माहिती मिळतात. तर काहीवेळेस अशुभ देखील ठरतो. शुक्राच्या या संक्रमणामुळे नवीन वर्षात 4 राशींवर संकटांचे ढग कोसळण्याची शक्यता आहे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत ती 4 राशी.

या 4 राशींवर मोठे संकट आहे

मीन (Pisces) :  वर्षातील शेवटचे शुक्र संक्रमण (Shukra Gochar 2022) या राशीसाठी अनेक प्रकारची संकटे घेऊन येत आहे. तसेच आरोग्याच्या बाबतीत तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुम्ही आणि तुमचा जोडीदार आजार पडू शकतात. पोटाशी संबंधित आजार देखील वाढू शकतात. तसेच तुमच्या आयुष्यात पैसा मिळवण्याच्या संधी येतील पण तुम्ही ती संधी गमवणार

मकर (Capricorn) : शुक्र (Shukra Gochar 2022) च्या या राशीमुळे तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुमच्या घरात मतभेद होऊ शकतात. तसेच पैशांमुळे भावंडांशी असलेले नाते बिघडू शकते. तुम्हाला नोकरीतही धक्का बसू शकतो आणि अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी शांत राहणे आणि समजून घेऊन समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करा.

वाचा : नवीन वर्षात 'या' 5 शुभ वस्तू घरा आणा; आर्थिक भरभराट होईल

कन्या (Virgo) : शुक्र गोचर (Shukra Gochar 2022) दरम्यान या राशीच्या लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. थोड्या फायद्यासाठी कोणतेही अनैतिक किंवा बेकायदेशीर काम करणे टाळा. रस्त्यावर वाहन चालवताना पूर्ण खबरदारी घ्या कारण  तुमच्यासोबत अपघात होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्यांपासून सावध राहा. कारण ते तुम्हाला त्यांच्या युक्तीत अडकवण्याचा प्रयत्न करतील. 

तूळ (Libra) : या वर्षातील शेवटचे शुक्र गोचर(Shukra Gochar 2022) तुळालाही प्रभावित करेल. तसेच कोणत्याही अज्ञात व्यक्तीकडून कोणतीही वस्तू खरेदी करू नका, तेच तुमच्यासाठी जास्त फायदेशीर ठरेल. 

 

 

 

(वर दिलेली माहिती सामान्य माहितीच्या आधारावर आहे.. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)   

Read More