Marathi News> भविष्य
Advertisement

Shash Rajyog: शनीने मार्गस्थ होत तयार केला शश राजयोग; 'या' राशींना धनलाभासह अपार यशाची संधी!

Shani Dev In Kumbh: 4 नोव्हेंबर रोजी शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ झाले आहेत. यावेळी त्यांनी कुंभ राशीत शश महापुरुष राजयोग तयार झाला. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, हा सर्वात शक्तिशाली योग मानला जातो. 

Shash Rajyog: शनीने मार्गस्थ होत तयार केला शश राजयोग; 'या' राशींना धनलाभासह अपार यशाची संधी!

Shani Dev In Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह त्यांच्या ठराविक वेळी राशीमध्ये बदल करतात. यामध्ये शनी देव सर्वात संथ गतीने राशी बदल करणारे ग्रह मानले जातात. नुकतंच शनी देव मार्गस्थ झाल्याने खास राजयोग तयार झाला आहे.

4 नोव्हेंबर रोजी शनी देव कुंभ राशीत मार्गस्थ झाले आहेत. यावेळी त्यांनी कुंभ राशीत शश महापुरुष राजयोग तयार झाला. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, हा सर्वात शक्तिशाली योग मानला जातो. या योगामुळे तीन राशींना होणार आहेत भरपूर लाभ होणार आहे. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांना शश राजयोगामुळे सकारात्मक परिणाम मिळणार आहेत. 

मेष रास

मेष राशीसाठी हा योग लकी सिद्ध होणार आहे. या लोकांना आर्थिक लाभ होईल. पैसे कुठेतरी गुंतवले तर फायदा होऊ शकतो. मेष राशीच्या लोकांच्या प्रत्येकावर त्यांच्या वागण्याचा प्रभाव पडेल. कामानिमित्त परदेशात जाण्याची संधीही मिळू शकते. या राशीच्या लोकांना व्यवसाय आणि नोकरीत लाभ मिळू शकणार आहे. समाजातील लोकांमध्ये तुमचा आदर वाढणार आहे.

मिथुन रास

शश राजयोगामुळे या राशींच्या लोकांना नशीब साथ देणार आहे. अशा अनेक गोष्टी घडणार आहेत ज्यामुळे आयुष्यात आनंद येणार आहे. व्यवसायात खूप वेगाने प्रगती होणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात मेहनत केल्यामुळे व्यक्तीची वेगळी ओळख निर्माण होईल. विवाहित लोकांना त्यांच्या जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळू शकते. भविष्यात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. 

मकर रास

या लोकांचे वैयक्तिक आयुष्य खूप चांगले असणार आहे. धनलाभ होण्याचीही शक्यता आहे. सर्व प्रलंबित कामं पूर्ण होणार असून जोडीदाराशी संबंध चांगले राहतील. आरोग्य सुधारेल आणि जुन्या आजारांपासून आराम मिळेल.या काळात काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.  भागीदारीत केलेल्या व्यवसायात भरपूर यश आणि नफा मिळेल. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळू शकतात.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More