Marathi News> भविष्य
Advertisement

Shani Transit: नव्या वर्षात 3 वेळा चाल बदलणार शनीदेव; 'या' राशींना होणार मालामाल

Shani Transit Impact: शनीदेव 2024 मध्ये शनिदेव तीन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. यावेळी त्यांच्या या स्थिती बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. 

Shani Transit: नव्या वर्षात 3 वेळा चाल बदलणार शनीदेव; 'या' राशींना होणार मालामाल

Shani Transit Impact: ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्याच्या राशीमध्ये बदल करतात. शनिदेवाला न्यायाची देवता मानलं जातं. यावेळी जर एखाद्या व्यक्तीने चांगलं काम केलं तर ते त्याच्या कर्मानुसार परिणाम देतील. शनिदेवाला कर्माची देवता मानलं जातं. असंच शनीदेव 2024 मध्ये शनिदेव तीन वेळा आपली स्थिती बदलणार आहे. यावेळी त्यांच्या या स्थिती बदलाचा सर्व राशींच्या व्यक्तींवर परिणाम होणार आहे. जाणून घेऊया ज्योतिष शास्त्रानुसार कोणत्या तीन राशींवर शनीच्या बदलांचा परिणाम होईल.

वृषभ रास

ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये शनिदेवाची प्रत्येक बदलती चाल या राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. प्रेम जीवनात रोमांस कायम राहणार आहे. कुठूनतरी आर्थिक लाभ मिळण्याचीही शक्यता आहे. तब्येतीत चढ-उतार होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या मुलाकडून काही चांगली बातमी मिळू शकते. या वर्षी आर्थिक स्थितीत सुधारणा होणार आहे. व्यवसायात निर्माण होणारी कोणतीही समस्या आपोआप सुटणार आहे.

सिंह रास

सिंह राशीच्या राशीलाही या वर्षी शनीच्या चालीमध्ये वारंवार होणाऱ्या बदलांचा लाभ मिळणार आहे. आर्थिक स्थितीत अनेक बदल दिसून येतील. तुमची प्रलंबित असलेली महत्त्वाची कामं पूर्ण होणार आहे. तुम्हाला व्यवसायात भागीदार देखील मिळू शकेल ज्याला भविष्यात नफा मिळणार आहे. करिअरमध्ये काही अडचण असेल तर ती या वर्षात सुटणार आहे. तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

कुंभ रास

2024 हे वर्ष शनिदेवामुळे कुंभ राशीच्या लोकांसाठी चांगले राहणार आहे. या राशीचे लोक धार्मिक कार्यात व्यस्त राहणार आहे. या राशीच्या लोकांना या वर्षी व्यवसायात फायदा होऊ शकतो. करिअर आणि व्यवसायात यश मिळणार आहे. आर्थिक मदत करू शकणारे लोक पुढे येणार आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. कुटुंबातील सर्वांशी संबंध सुधारणार आहेत. कोणत्याही व्यवसायाशी संबंधित असलेल्यांना चांगला सौदा मिळू शकतो.

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More