Marathi News> भविष्य
Advertisement

Shani Gochar: मकर राशीतील वक्री शनि तीन राशींसाठी लाभदायी, ऑक्टोबरपर्यंत 'नो टेन्शन'!

12 जुलैपासून शनि वक्री झाला असून कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे.

Shani Gochar: मकर राशीतील वक्री शनि तीन राशींसाठी लाभदायी, ऑक्टोबरपर्यंत 'नो टेन्शन'!

Vakri Shani Gochar 2022: ज्योतिषशास्त्रानुसार शनि ग्रह सर्वात मंद गतीने गोचर करणारा ग्रह आहे. अडीच वर्षांनंतर शनि ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. गोचर करताना सूर्य आणि चंद्र हे ग्रह सोडले तर बाकी सर्व ग्रह वक्री होतात. त्यामुळे वक्री स्थिती काही राशींसाठी शुभ, तर काही राशींसाठी अशुभ असते. 12 जुलैपासून शनि वक्री झाला असून कुंभ राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे. 23 ऑक्टोबरपर्यंत शनि या स्थितीत असणार आहे. यामुळे तीन राशींच्या कुंडलीत महापुरुष राजयोग तयार झाला आहे. ही गोचर स्थिती सर्वासमावेशक असते, त्यामुळे तुमच्या वैयक्तिक कुंडलीत ग्रहांची स्थिती काय आहे? हे सुद्धा महत्त्वाचं असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगितलं आहे. चला तर जाणून घेऊयात, कोणत्या राशींना मिळणार नशिबाची साथ

मेष : मेष राशीच्या लोकांना महापुरुष योग लाभदायी आहे. या लोकांना अचानक पैसे मिळू शकतात. राजकारणात सक्रिय असलेल्या लोकांना मोठे पद मिळू शकते. तसेच नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना नवीन नोकरी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. एकूणच हा काळ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.

मिथुन : मिथुन राशीच्या लोकांना करिअर-व्यवसायातही चांगले यश मिळेल. विशेषतः मिथुन राशीच्या व्यावसायिकांना मोठा फायदा होईल. तुम्हाला या काळात सन्मान मिळेल. हाराजकीय क्षेत्रातून फायदा होऊ शकतो. नोकरी शोधणाऱ्यांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. परदेशात काम करणाऱ्यांनाही मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे.

कन्या : हा महापुरुष योग कन्या राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ देईल. प्रत्येक कामात यश मिळेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. विशेषत: सरकारी क्षेत्राशी संबंधित कामांना वेग येईल. परीक्षा-मुलाखतीत यश मिळेल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या ठिकाणी प्रवेश मिळू शकतो. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

Read More