Marathi News> भविष्य
Advertisement

Shani Jayanti 2023 : वर्षभर या राशींवर शनिचा प्रकोप! शनि जयंतीला करा हे उपाय, अपूर्ण कामंही होतील पूर्ण

Shani ki Sadesati Remedies : शनिदेव हा आपल्याला कर्मचं फळ देतो. ज्या लोकांनी चांगले कर्म केले त्यांच्यावर शनी प्रसन्न असतो पण ज्यांचे कर्म वाईट असतं त्यांच्यावर शनिची वक्रदृष्टी असते. शनि जयंतीला उपाय केल्यास तुमच्यावरील संकट दूर होईल. 

Shani Jayanti 2023 : वर्षभर या राशींवर शनिचा प्रकोप! शनि जयंतीला करा हे उपाय, अपूर्ण कामंही होतील पूर्ण

Shani Jayanti 2023 Upay in marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रात 9 नक्षत्र आणि 12 ग्रहांना खूप महत्त्व आहे. नक्षत्र आणि ग्रहांच्या हालचालीवर आपल्या आयुष्यावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम दिसून येतात. पण शनिचं नाव घेतलं की प्रत्येकाला भीती वाटते. शनिदेव न्यायाची देवता आहे. त्यामुळे चांगले कर्म केल्यास चांगलं फळ आणि वाईट कर्म केल्यास शनिदेवतेचा प्रकोप...अशात येणारी शनी जयंतीला वैदिक ज्योतिषशास्त्रात सांगते उपाय केल्यास शनीदेवाच्या वक्रदृष्टीपासून वाचू शकतो. 

कधी आहे शनिजयंती?

यंदा शनि जयंती 19 मे 2023 ला असणार आहे.  यादिवशी विधीवत पूजा केल्यास सर्व समस्या दूर होतात आणि शनिदेवाच्या धैय्यापासून आपली मुक्ती होते, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. तुमच्या कुंडलीत शनिदोष किंवा शनिचा त्रास असल्यास शास्त्रात काही उपाय सांगितले आहेत. (shani jayanti 2023 upay Shani Sadesati Shani Dhaiya Remedies in marathi )

'या' तीन राशींनी राहवं सतर्क!

ज्योतिषशास्त्रांनुसार मकर, मीन आणि कुंभ राशीच्या लोकांवर शनीची साडेसाती सुरु आहे. त्यामुळे त्यांनी कामात कितीही मेहनत केली तरीही यश मिळत नाही. सतत आजारपण त्यांच्या पाठीशी लागलेलं असतं. या सर्व संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी या लोकांनी नियमितपणे हनुमान चालीसा आणि बजरंग बाण पठाणचं वाचण करावं. त्याशिवाय शिव मंदिरात पूजा आणि दान करावं. 

शनि जयंतीला करा 'हे' उपाय!

शनीची धैय्या किंवा साडेसातीचा त्रास असेल तर शनि जयंतीच्या दिवशी धतुऱ्याचं बीज अर्पण करावं. भगवान शंकर हे शनिदेवाचे दैवत असल्याने शनि जयंतीच्या दिवशी भोलेनाथाची पूजा करा. ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय केल्यास सर्व संकटं दूर होतील. 

 शनि साती किंवा धैय्याचा त्रास असल्यास शनि जयंतीच्या दिवशी शनी मंदिरात जाऊन शनिदेवाची पूजा करा. पण पूजा करताना शनिदेवाच्या डोळ्यात पाहू नका. असं म्हणतात की शनिदेवाच्या डोळ्यात पाहिल्यास घरात संकट येतात. त्यामुळे शनिदेवाची पूजा करताना कायम चरणाकडे पाहावे. त्याशिवाय तेलाच्या पात्रात त्याची सावली पाहून दान करा. 

शनीची साडेसाती असल्यास मांसाहार आणि मद्यपानापासून दूर रहा. अन्यथा शनिदेवाचा तुमच्या कोप वाढतो. या लोकांनी शनि जयंतीला काळे श्वास, कावळा किंवा काळ्या बैलाला अन्नदान करा. हा उपाय केल्या शनिदेवाचा राग कमी होतो, असं म्हणतात. 

(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.) 

Read More