Marathi News> भविष्य
Advertisement

Shani Nakshatra Gochar: शनी देव भाद्रपद नक्षत्रात करणार गोचर; 'या' राशी मालामाल होण्याची शक्यता

Shani Dev Nakshatra Parivartan : शनी देव राहु ग्रहाचं नक्षत्र शतभिषा नक्षत्रात उपस्थित आहेत. शनी देव 6 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. 

Shani Nakshatra Gochar: शनी देव भाद्रपद नक्षत्रात करणार गोचर; 'या' राशी मालामाल होण्याची शक्यता

Shani Dev Nakshatra Parivartan : प्रत्येक ग्रह त्याच्या ठरलेल्या दिवशी राशीमध्ये बदल करतो. वैदिक ज्योतिष्य शास्त्रामध्ये शनी देवाला सर्वात संथ गतीने चालणारा ग्रह मानला जातो. शनिदेवाला सर्वात शक्तिशाली देवता मानलं जातं. शनी देवाला आपल्या भक्तांना त्यांच्या कर्मानुसार फळ देतो. शनी राशीप्रमाणे त्यांच्या नक्षत्रात देखील बदल करतात. 

येत्या काळात शनी देव त्यांच्या नक्षत्रात बदल करणार आहे. शनी देव राहु ग्रहाचं नक्षत्र शतभिषा नक्षत्रात उपस्थित आहेत. शनी देव 6 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजून 55 मिनिटांनी पूर्व भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना या याचा गोचरचा फायदा होणार आहे. जाणून घेऊया या राशी कोणत्या आहेत.

मेष रास

मेष राशीच्या लोकांसाठी शनिदेवाचा नक्षत्र बदल खूप फायदेशीर ठरणार आहे. या काळात त्यांच्या आयुष्यात फक्त आनंदच येणार आहे. तसंच नोकरीत बढतीची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहणार आहे. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणीही लाभ मिळण्याची शक्यता आहे.

वृषभ रास

वृषभ राशीच्या लोकांसाठी शनीचं नक्षत्र गोचर खूप शुभ मानलं जातं. या काळात तुमच्या कौटुंबिक नात्यात गोडवा येणार आहे. जर तुम्ही खूप दिवसांपासून परदेशात जाण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुमचं स्वप्न लवकरच पूर्ण होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी अपेक्षित निकाल मिळविण्यासाठी हा चांगला काळ मानला जातोय. नवीन ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे. 

सिंह रास

सिंह राशीच्या लोकांना शनिदेवाच्या राशीत बदलामुळे भरपूर लाभ मिळणार आहेत. कौटुंबिक संबंध दृढ होणार आहेत. हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. तुम्ही काम-व्यवसायाशी संबंधित कारणांसाठी देश-विदेशात प्रवास करू शकता. तुमचे जुने अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. नोकरदारांना बढती मिळण्याची चिन्हे आहेत. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More