Marathi News> भविष्य
Advertisement

Diwali 2023 : दिवाळीपूर्वी 'या' लोकांच्या दारात येईल लक्ष्मी, शुक्र-शनिमुळे अमाप पैसासोबत घरात नांदेल सुख समृद्धी

Diwali 2023 : दसरानंतर वेध लागतात ते दिवाळीचे...नोव्हेंबरमधील ग्रहांच्या शुभ संयोगामुळे काही लोकांच्या दारात लक्ष्मीचं आगमन होणार आहे.  अमाप पैसासोबत घरात सुख समृद्धी नांदेल. 

Diwali 2023 : दिवाळीपूर्वी 'या' लोकांच्या दारात येईल लक्ष्मी, शुक्र-शनिमुळे अमाप पैसासोबत घरात नांदेल सुख समृद्धी

Saturn Direct and Venus Transit In November : हिंदू धर्मात दिवाळी हा सर्वात मोठा सण असतो. दसऱ्यानंतर लोकांना वेध लागतात ते दिवाळीचे. यंदा दिवाळी 12 नोव्हेंबरला असणार आहे. ही दिवाळी काही राशींच्या आयुष्या लक्ष्मी, सुख समृद्धी घेऊन आली आहे. नोव्हेंबर महिन्यातील ग्रहांच्या संयोगामुळे दिवाळी अतिशय शुभ असणार आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला 3 नोव्हेंबरला शुक्र गोचर होऊन कन्या राशीत तर 4 नोव्हेंबरला शनी थेट कुंभ राशीत मार्गी होणार आहे. शनि आणि शुक्राच्या आशीवार्दाने दिवाळीपूर्वीच लोकांवर धनवर्षाव होणार आहे. (saturn direct and venus transit in november before diwali 2023 Lakshmi will come to the door of  these zodiac people happiness and prosperity money)

'या' लोकांच्या दारात येईल लक्ष्मी

मेष (Aries Zodiac)

या लोकांची करिअरमध्ये प्रगती होणार आहे. काही सुखद आणि सकारात्मक बदल आयुष्यात चैतन्य आणणार आहे. कुटुंबात आणि समाजात तुमचा आदर वाढणार आहे. व्यवसायासाठी हा काळ प्रगती घेऊन आला आहे. आरोग्यात सुधारणार होणार आहे. अडकलेला पैसा परत मिळणार आहे. 

वृषभ (Taurus Zodiac) 

हा काळ तुमच्यासाठी नशीब ठरणार आहे. आत्तापर्यंतच्या आयुष्यात ज्या उणिवा होत्या त्या सगळ्या शुक्र आणि शनिदेवामुळे दूर होणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने तुम्हाला भरपूर संपत्ती मिळणार आहे. तसंच, आनंद तुमच्या आयुष्यात दार ठोठवणार आहे. अविवाहित लोकांचे लग्न ठरणार आहे. काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. मोठे पद आणि मान-सन्मानात वाढणार आहे. 

मिथुन (Gemini Zodiac)

या लोकांना शुक्रदेव आणि शनिदेव आर्थिक फायदा घेऊन आला आहे. तुमचे अडकलेले पैसे परत मिळणार आहे. कार्यक्षेत्रात यशाची पायरी चढणार आहात. नवीन संधी तुमची वाट पाहत आहे. व्यवसायिकांसाठी हा काळ उत्तम असणार आहे. चांगली बातमी तुम्हाला मिळणार आहे. कुटुंबातील समस्या दूर होणार आहे. 

हेसुद्धा वाचा - Rahu Ketu Gochar 2023: दसरानंतर 30 ऑक्टोबरला वर्षातील सर्वात मोठ राशी परिवर्तन, मायावी राहू केतूमुळे 'या' लोकांचं आयुष्य घेरणार संकटाने

धनु (Sagittarius Zodiac)

नोव्हेंबरमध्ये हा तुमच्यासाठी भाग्यवानी ठरणार आहे. शुक्र आणि शनीच्या कृपेने सर्व अडथळे दूर होणार आहेत. मोठा आर्थिक लाभही तुम्हाला होणार आहे. कौटुंबिक जीवनात आनंदी आनंद असणार आहे. तुमच्या सन्मानात खूप वाढ होणार आहे. उच्च पद मिळण्याची आणि पगारात वाढ होणार आहे. यावेळी गुंतवणूक करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Read More