Marathi News> भविष्य
Advertisement

Sankashti Chaturthi: आज संकष्टी चतुर्थी, पंचक आणि भद्राचे सावट? 'या' मुहूर्तावर करा पूजा

Sankashti Chaturthi 2023 : आज संकष्टी चतुर्थी आहे. आजचा दिवस हा गणपती बाप्पाला समर्पित आहे. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला खूप महत्त्व आहे.  या दिवशी भक्त पूर्ण भक्तीभावाने गणेशाची पूजा करतात तसेच त्याची आराधना करतात. पंचक आणि भद्र योग असल्याने कोणत्या मुहूर्तावर पूजा करायची ते जाणून घ्या.

Sankashti Chaturthi: आज संकष्टी चतुर्थी, पंचक आणि भद्राचे सावट? 'या' मुहूर्तावर करा पूजा

Sankashti Chaturthi 2023 : संकष्टी चतुर्थी श्रावण महिन्यात कृष्ण पक्षात येते. हिला गजानन संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आज गजानन संकष्टी चतुर्थी व्रत पाळू शकता. संकष्टी चतुर्थी व्रत आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला साजरे केले जाते. यंदा आषाढातील संकष्टी चतुर्थीवर पंचक आणि भद्रकाळाचे सावट आहे. संकष्टीच्या व्रतामध्ये गणेशाची पूजा करुन रात्री चंद्राची पूजा करावी. यावेळी अर्घ्य दिले तरच हे व्रत पूर्ण मानले जाते. 

कृष्ण पक्षात चंद्र उशिरा उगवतो. त्यामुळे उपवास करणाऱ्यांना चंद्राला अर्घ्य अर्पण करण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागेल.  बाप्पाच्या पूजेसाठी शुभ वेळ आणि चंद्रोदयाची वेळ कोणती आहे, याविषयी अधिक माहिती जाणून घ्या.

 संकष्टी चतुर्थी 2023 

सध्या श्रावण महिना सुरु झाला आहे. तसेच पंचांगानुसार, आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी गुरुवार 6 जुलै रोजी सकाळी 06.30 वाजता सुरु झाली आहे. ती दुसऱ्या दिवशी शुक्रवार 7 जुलै रोजी पहाटे 03.12 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार आज संकष्टी चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे.

संकष्टी चतुर्थीसाठी कोणते पूजा मुहूर्त आहेत?

आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती पूजनाचा शुभ मुहूर्त पहाटे 05.26 पासून सुरु झाला आहे. तो 10.40 पर्यंत आहे. यामध्ये देखील सकाळी  10.40 पर्यंतची वेळ अत्यंत शुभ आहे. या शुभ काळात तुम्ही तुमच्या सोयीनुसार संकष्टी चतुर्थीची पूजा करु शकता.

गणपती संकष्टी चतुर्थीला सकाळपासून प्रीति योग तयार झाला आहे. पण पंचक आणि भद्रकाळाचे  सावट आहे. या दिवशी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रीति योग आहे. भद्राची वेळ पहाटे 5.29 ते 6.30 पर्यंत होती. चतुर्थीच्या दिवशी पंचक दुपारी 01:38 पासून सुरु होत आहे.

बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील 

आज चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदय उशिरा असणार आहे. आजच्या दिवशी रात्री 10:14 वाजता चंद्रोदय होईल. त्यावेळी चंद्राला अर्घ्य अर्पण करून व्रत पूर्ण करावे. तसेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेशपूजेच्या वेळी गणपती बाप्पाला सिंदूर, दुर्वा, मोदक, लाल वस्त्र आणि पान अर्पण करावे. या 5 वस्तू अर्पण केल्याने गणपती बाप्पा तुमच्यावर प्रसन्न होतील.

संकष्टी चतुर्थीचे काय आहे महत्त्व ?

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी व्रत केले जाते. जे लोक हे व्रत करुन गणपतीची पूजा करतात. त्यांचे दुःख दूर होतात. जीवनात समृद्धी, सुख, शांती येते. कामात येणारा अडथळा दूर होतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याची पुष्टी करत नाही.)

Read More