Marathi News> भविष्य
Advertisement

धनत्रयोदशीच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी सोनं खरेदी करु नये

पाहा सोनं कोणत्या राशी शुभ आणि कोणत्या राशीसाठी अशुभ

धनत्रयोदशीच्या दिवशी या राशीच्या व्यक्तींनी सोनं खरेदी करु नये

मुंबई : धनत्रयोदशी हा दिवाळीतीला रोशनाईच्या सण मानला जातो. दिवाळीच्या 2 दिवसाआधी हा सण येतो. धनत्रयोदशीच्या दिवशी पूजेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी धन आणि आरोग्यासाठी लक्ष्मीसह भगवान कुबेरची देखील पूजा केली जाते. हिंदू धर्मात अशी मान्यता आहे की, या दिवशी सोनं आणि चांदी खरेदी करणं शुभ मानलं जातं. या दिवशी घरात काहीना काही आणणं शुभ मानलं जातं.

अनेक जण या दिवशी घरात सोन्याचे दागिणे खरेदी करतात. काही जण सोन्याची नाणी देखील घेतात. यामुळे घरातील नकारात्मकता निघून जाते अशी देखील मान्यता आहे. ही पंरपरा अनेक वर्षांपासून सुरु आहे. पण ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक धातू आपल्यावर प्रभाव टाकतो. प्रत्येक धातूचा एका खास ग्रहासोबत संबंध असतो. ग्रह त्यानुसार त्या धातूवर प्रभाव टाकतो. ज्योतिषशास्त्रानुसार सोनं सगळ्या ग्रहांशी संबंधित आहे. पण त्याचा सरळ प्रभाव बृहस्पतीवर होतो.

सोनं ज्यांच्यासाठी शुभ नाही अशा व्यक्तींना सोनं नाही घातलं पाहिजे. सोनं कोणत्या राशीसाठी अशुभ आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. 

शुभ राशी

मेष, कर्क, सिंह आणि धनु राशीसाठी धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ असतं. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींनी सोनं खरेदी केलं पाहिजे.

अशुभ राशी

वृषभ, मिथुन, कन्या, तुळा, मकर आणि कुंभ या राशीच्या व्यक्तींसाठी सोनं अशुभ आहे. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी या राशीच्या लोकांनी सोनं खरेदी करु नये. या राशीच्या लोकांनी सोन्याच्या ऐवजी इतर कोणत्या ही धातूच्या वस्तू खरेदी केल्या पाहिजे.

कोठे ठेवावे सोनं? 
 
सोनं समृद्धीचं प्रतीक मानलं जातं. पण ज्योतिष शास्त्रानुसार सोनं कोठे ठेवलं जातं हे देखील महत्त्वाचं असतं. सोनं हे नेहमी लाल रंगाच्या कपड्यात किंवा कागदात ठेवलं पाहिजे. सोन्याच्या वस्तू सोबत नकली धातू नाही ठेवले पाहिजे. सोनं घराच्या ईशान्य किंवा नैऋत्य कोपऱ्य़ात ठेवलं पाहिजे. यामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल.

Read More