Marathi News> भविष्य
Advertisement

Shukra-Mangal Yuti: होळीच्या दिवशी मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना प्रत्येक कार्यात मिळणार यश

Shukra And Mangal Yuti: मंगळ धैर्य, निर्भयता, रक्त, संपत्ती आणि मोठा भाऊ यांचा कारक आहे, तर शुक्र वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, विलास, भौतिक सुख आणि वैवाहिक जीवनाचा कारक आहे. होळीच्या दिवशी या दोन ग्रहांच्या संयोगाची निर्मिती काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. 

Shukra-Mangal Yuti: होळीच्या दिवशी मंगळ-शुक्राची होणार युती; 'या' राशींना प्रत्येक कार्यात मिळणार यश

Shukra And Mangal Yuti: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी होळीच्या दिवशी ग्रहांचा सेनापती मंगळ आणि धनाचा दाता शुक्र यांचा संयोग होणार आहे. हा संयोग कुंभ राशीमध्ये तयार होतोय. काही राशींसाठी हा संयोग चांगला आणि लाभदायक असणार आहे. 

मंगळ धैर्य, निर्भयता, रक्त, संपत्ती आणि मोठा भाऊ यांचा कारक आहे, तर शुक्र वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, विलास, भौतिक सुख आणि वैवाहिक जीवनाचा कारक आहे. होळीच्या दिवशी या दोन ग्रहांच्या संयोगाची निर्मिती काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींसाठी हा योग लाभदायक ठरणार आहे. 

मेष रास (Aries Zodiac)

मंगळ आणि शुक्राचा संयोग तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. यावेळी तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होऊ शकते. तुम्ही उत्पन्नाच्या नवीन माध्यमांतून पैसे कमवण्यात यशस्वी व्हाल. अनपेक्षित आर्थिक लाभही मिळू शकतो. तुमचा आर्थिक फायदा प्रचंड होईल. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. 

वृषभ रास (Taurus Zodiac)

वृषभ राशीच्या लोकांसाठी मंगळ आणि शुक्राची जोडी शुभ ठरू शकते. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात मोठे यश मिळू शकते. तुम्ही तुमच्या भविष्यासाठी काही पैसे वाचवू शकाल. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात व्यावसायिकांना चांगला नफा होऊ शकतो. तुम्ही तुमच्या करिअरमध्येही प्रगती कराल.

मकर रास (Makar Zodiac)

मंगळ आणि शुक्राची जोडी तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते. या काळात तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. यामध्ये तुम्हाला चांगली बचतही मिळेल. तुमचे व्यक्तिमत्वही सुधारेल. तसेच तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून प्रत्येक पावलावर पूर्ण पाठिंबा मिळेल. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतात. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )

Read More